Saturday, 05 Oct, 2.42 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
मराठवाड्यात बंडखोरीचे ग्रहण अन् जोरदार शक्तिप्रदर्शन; 48 मतदारसंघासाठी आले दीड हजारांवर अर्ज

औरंगाबादः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस, शुक्रवार उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फेरी, सभांनी शक्तिप्रदर्शन करीत गाजविला. अखेरपर्यंत जाहीर होणारी उमेदवारी, नाराजी नाट्य, त्यातून उफाळलेली बंडखोरी, बंडखोरी करणाऱ्यांनाही आरोप प्रत्यारोपांसह शक्तिप्रदर्शन करीत भरलेले अर्ज हे आजचे वैशिष्ट्य ठरले. पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली, तर नेत्यांनी भरपावसातच भाषण ठोकले.

मराठवाड्यातील 48 मतदारसंघात सुरवातीला उमेदवारी अर्ज ताब्यात घेण्यावरच बहुतांश उमेदवारांनी भर दिला होता. नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर अनेकांनी अर्ज दाखल करायला सुरवात केली. प्रमुख पक्षांच्या उमेदवारी याद्या टप्प्याटप्प्याने आणि अंतिम दिवसापर्यंत येत राहिल्याने काल व आज शक्तिप्रदर्शनाने राजकीय धुरळा उडाला. अनेकांनी फेरी, सभा घेत उमेदवारी अर्ज दाखल केले. अखेरच्या दिवशी, अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अधिक होती. बहुतांश मतदारसंघांत उमेदवारांची गर्दी असून उमेदवारी अर्जांची शनिवारी (ता. पाच) छाननी होईल. सात ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेता येतील. त्यानंचरच लढतींचे खरे चित्र समोर येईल.

दीड हजारांवर अर्ज

मराठवाड्यात 48 मतदारसंघ आहेत. आठपैकी सात जिल्ह्यांतील मतदारसंघांत सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. सायंकाळनंतर अर्जांची जुळवाजुळव करण्यात प्रशासन गर्क होते. छाननीसाठी सज्जता होत होती

मतदारसंघ : उमेदवार : दाखल अर्ज

जालना : 64 : 85
बदनापूर : 24 : 39
भोकरदन : 9 : 20
घनसावंगी : 29 : 41
परतूर : 24 : 32
एकूण : 150 : 217

हिंगोली : 17 : 26
कळमनुरी : 20 : 30
वसमत : 21 : 28
एकूण : 58 : 84

परभणी : 28 : 37
जिंतूर : 19 : 27
पाथरी : 15 : 19
गंगाखेड : 26 : 42
एकूण : 88 : 125

नांदेड : नऊ मतदारसंघांत 492 अर्ज

गेवराई : 29 : 43
माजलगाव : 65 : 91
बीड : 54 : 71
आष्टी : 26 : 33
केज : 17 : 26
परळी 41 : 53
एकूण : 203 : 317

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top