Monday, 13 Jul, 5.01 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
मोठी बातमी! अजूनही राज्यात परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

मुंबई : देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व जिल्ह्यातली जिल्हधिकारी, पालकमंत्री, प्रशासन आपआपल्या पद्धतीने पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेत आहेत.असे असतांना राज्यात परीक्षेवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद होताना दिसत आहे.

आज (दि.१३) दुपारी १ वाजता राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी विद्यापीठ अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत चर्चा झाली. त्यामध्ये ठाकरे सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचा निर्णय झाला. विद्यापीठ परीक्षांबाबत न्यायालयात याचिका दाखल असल्याने वाट पाहणार आहे तसेच इतर राज्यांशीही चर्चा केली जाणार आहे. अशीही भूमिका सरकारने घेतली आहे.

महाराष्ट्रासह पंजाब, ओदिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि दिल्ली यांनाही विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास जाहीरपणे आपला विरोध दर्शवला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. गुणवत्ता आणि भविष्यातील संधीसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन महत्त्वाचे असल्याचेही मंत्रालयाने म्हटलं आहे.

सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणं शक्य नाही असंही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी यूजीसी घेणार का? असंही उदय सामंत यांनी विचारलं आहे. तसंच करोना गेल्यानंतर परीक्षा घेण्याचा घेण्याची तयारी आहे असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

..तर पुढच्या निवडणुका एकत्र लढवू, शरद पवारांचे संकेत

ताबडतोब जयपूरला हजर व्हा;मुख्यमंत्री गेहलोतांचे पायलट आणि आमदारांना आदेश

‘परीक्षा आजच्या उद्या घेता येतील मात्र विद्यार्थांच्या आरोग्याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top