Sunday, 15 Sep, 1.40 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा म्हणजे सर्वसामान्यांना त्रास : सुप्रिया सुळे

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच नेते मंडळी चांगलेच सक्रीय होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी यांसारख्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश बारामतीमध्ये यात्रा झाली.

याच पार्श्वभूमीवर या यात्रेदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा एकच साहेब पवार साहेब अशा घोषणांची नारेबाजी सुरू केली. या घटनेनंतर त्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेध केला आहे.

यावेळी खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा म्हणजे सर्वसामान्यांना त्रास आहे, असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका केली आहे. तसेच पुढे बोलताना म्हणाल्या, ज्या शहरामध्ये महाजनादेश यात्रा जाते तिथे झाडांच्या फांद्या तोंडल्या जातात असे यावेळी खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, पुण्यामध्ये करण्यात आलेल्या बॅनर संदर्भात देखील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा निषेध केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top