Tuesday, 15 Oct, 10.54 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
'पैलवान दिसत नाही मग नरेंद्र मोदी, अमित शहा आखाडा खणायला येतात का?'

टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेतेही प्रचारात सक्रीय झालेले आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे कोल्हापूर दक्षिणचे आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

यावेळी बोलताना कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पैलवान दिसत नाही मग पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आखाडा खणायला येतात का? ही वाट परिवर्तनाची वाट आहे. राज्यभरात फिरत असताना संपूर्ण वातावरण फिरलंय. तरुणांचा झंझावत आला आहे. पंतप्रधानांपासून सगळे महाराष्ट्रात यायला लागलेत असं अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना कोल्हे यांनी जाहिराती बघून तेल, साबण निवडायचे असतात सरकार नाही. लोकशाहीत प्रत्येक स्वतंत्र्य आहे, टीका करताना विचारांवर झाली पाहिजे भूमिकेवर झाली पाहिजे, छातीवर कमळाचं चित्र असलेला टी शर्ट घालून ३५ वर्ष शेतकऱ्याने आत्महत्या केली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, तरुणांचा, महिलांचा विश्वास नसेल तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा प्रश्न सरकारला विचारला.

दरम्यान पुढे बोलताना ‘महाराष्ट्राची दिवाळी सुखाने साजरी करायची असेल तर भाजपा-शिवसेनेचं दिवाळं वाजल्याशिवाय महाराष्ट्राची दिवाळी साजरी होणार नाही असंही विधान अमोल कोल्हे यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top