Tuesday, 15 Oct, 10.58 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
पैलवान लांडगेंनी केला 'वस्ताद'वर राजकीय पलटवार; हुकमी एक्के केले आपल्या बाजूने

टीम महाराष्ट्र देशा : भोसरी विधानसभा मतदार संघात 'महायुती'चे उमेदवार महेश लांडगे आणि अपक्ष उमदेवार विलास लांडे यांच्या लढत होत आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून भोसरीच्या राजकारणातील 'वस्ताद' विलास लांडे यांच्यावर पैलवान महेश लांडगे यांनी राजकीय पलटवार केल्याचे दिसत आहे. मतदार संघातील सर्वपक्षीय प्रमुख मोहरे लांडगे यांनी आपल्या बाजुने फिरवल्यामुळे अपक्ष उमेदवार लांडे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

भोसरीचे विद्यमान महेश लांडगे यांना पैलवान म्हणून ओळखले जाते. लांडगे यांच्याविरोधात माजी आमदार लांडे यांनी शड्डू ठोकला. आमदर लांडगे यांनी २०१४ मध्ये अपक्ष निवडणूक लढवत सर्वपक्षीय लांडे विरोधकांची मोट बांधली होती. त्याचा फायदा झाल्यामुळेच लांडगे आमदार झाले. त्यावेळी विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर अधिकृतपणे निवडणूक लढवली होती. आता २०१९ मध्ये चित्र याउलट आहे. महेश लांडगे यांनी महायुतीची अधिकृत उमेदवारी घेतली आहे. पण, लांडे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

पक्ष की अपक्ष याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच लांडे यांनी अपक्ष अर्ज भरला. 'महायुती' झाली तर मतदार संघ शिवसेनेला सोडला जावा किंवा महायुती तुटली तर शिवसेनेची उमेदवारी मिळावी. यासाठी लांडे यांनी 'मातोश्री'वर अनेक दिवस 'फिल्डिंग' लावली होती. 'महायुती'चा निर्णय होईपर्यंत लांडेंनी राष्ट्रवादीला 'वेटिंग'वर ठेवले होते. त्यासाठी आपण अपक्ष लढवणार आहोत. राष्ट्रवादीकडून लढणार नाही.अशीच भूमिका त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. त्यापाठीमागे लांडगे विरोधी सर्वपक्षीयांची मोट बांधून अपक्ष निवडणूक लढवायची, असाच त्यांचा पवित्रा राहीला आहे. अखेर लांडे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना पुरस्कृत केले आहे.

भाजपमध्ये लांडगे यांच्यावर असलेले नाराज असलेला गट, शिवसेना, आरपीआयमधील नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते, काँग्रेस तसेच लांडगे समर्थकांमधील नाराजांची फळी उभा करुन निवडणुकीत वज्रमूठ तयार करण्याची रणनिती लांडे यांनी आखली होती. त्यातच लांडे समर्थकांनी 'सोशल मीडिया'वर आठ दिवसांपासून 'पैलवानाला सांगा.वस्ताद आला आहे' असे 'ब्रँडिंग'ही सुरू केले आहे. त्याद्वारे आमदार लांडगे पैलवान असतील, तर लांडे वस्ताद आहेत.अशी वातावरण निर्मीती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

लांडे यांची ही खेळी लक्षात घेवून आमदार लांडगे यांनी गेल्या काही दिवसांपासून विरोधी किंवा नाराज असलेल्या प्रमुख मोहऱ्यांना आपल्या बाजूने फिरवले आहे. त्यामध्ये सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीची सभापती विलास मडिगेरी, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष, नगरसेवक रवी लांडगे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैलजा मोळक आदींनी लांडगे यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला आहे.
तसेच, शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील, सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, नेते धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, नेताजी काशिद, तुषार सहाणे, निलेश मुटके, सचिन सानप, आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार लांडगे यांचा जाहीरपणे प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील नाराजांची मोट बांधण्याची लांडे यांची खेळी अयशस्वी झाल्याचे स्पष्ट होत आहे.

त्यामुळे लांडगे विरोधी किंवा नाराजांना एकत्र करुन राजकीय 'डाव' साधण्याचा प्रयत्न करणारे लांडे आता एकाकी पडले आहेत. याउलट, राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी घेतली असती, तर हितावह झाले असते, अशी भूमिका राष्ट्रवादीतीलच काहीजण बोलून दाखवत आहेत. अनेकांनी पक्षाचे असते, तर उघडपणे काम केले असते, असाही पवित्रा घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत अडचण नको.म्हणून अनेकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचेही पहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीतील अनेक मोहोरे लांडगेंच्या मदतीला.

भोसरी मतदार संघातील एकूण ४८ पैकी १३ नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. त्यापैकी नगरसेवक दत्ता साने, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, संजय वाबळे, पंकज भालेकर, पौर्णिमा सोनवणे एव्हढेच प्रमुख मोहरे लांडे यांच्या प्रचारात सक्रीय दिसत आहेत. अन्य नगरसेवकांनी अद्याप प्रभावीपणे प्रचार केल्याचे दिसत नाही. याउलट, गेल्या महापालिका निवडणुकांत राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढलेल्या अनेकांनी राष्ट्रवादीची साथ सोडून लांडगे यांचे काम उघडपणे सुरू केल्याचे दिसत आहे. नगरसेविका विनया तापकीर यांचे पती प्रदीप तापकीर यांनी जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक वसंत लोंढे , विष्णूपंत नेवाळे, संजय पठारे, शरद बोऱ्हाडे, संदेश आल्हाट, आनंदा यादव, अर्जुन ठाकरे, घनश्याम खेडेकर, आशा सुपे, सुनिता गवळी, संतोष लांडगे, अजित रमेश गव्हाणे , शांताराम भालेकर, विलास भालेकर, सुनील लोखंडे, निलेश नेवाळे या प्रमुख मोहऱ्यांनी महेश लांडगे यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>