Thursday, 19 Sep, 12.34 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
परळीतून तर मीच विजयी होणार, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. माझी मतदारसंघात देखील ते मायनसमध्ये आहेत. गेल्या पाच वर्षात मतदारसंघासाठी मोठा निधी आणला आहे, त्यामुळे धास्ती वाटायंच काम नाही. परळीतून पुन्हा एकदा मीच आमदार होईल, असा विश्वास ग्रामीणविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी बीडमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना परळीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे २०१४ प्रमाणे परळीकरांना पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे लढाई पहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर पंकज मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीची मला धास्ती नाही, विरोधक ज्या पद्धतीने कामाला लागले आहेत, त्यावरून त्यांनाच धास्ती वाटल्याचं दिसत आहे. अशी टीका पंकजा यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात जिल्ह्यातील उमेदवार जाहीर केले आहेत. सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना धनंजय मुंडेंच्या होमपिचवर शरद पवारांनी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेवराई- विजयसिंह पंडित, केज- नमिता मुंदडा, बीड- संदीप क्षीरसागर, माजलगाव- प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवारांनी जाहीर केले. एकमेव आष्टी या मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top