Saturday, 23 Jan, 3.13 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
पीएनबी बँकेचे ग्राहक आहात ! तर तुमच्या एटीएम व्यवहारांमध्ये होणार 'हा' बदल

नवी दिल्ली: सध्या देशात बँक गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर आरबीआय ने मोहीम सुरु केली आहे यामध्ये राज्यासह देशातील अनेक खाजगी संस्था आणि बँकांच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील वाढत्या एटीएम घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने मोठे पाऊल उचललेय.

त्यामुळे पीएनबी १ फेब्रुवारी २०२१ पासून पीएनबी ग्राहक नॉन-ईएमवी एटीएम (Non-EMV ATM) मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत. म्हणजेच आपण ईएमव्ही नसलेल्या मशिनमधून पैसे काढू शकणार नाही. पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिलीय.

पंजाब नॅशनल बँकेने यासंदर्भात ट्विट केले आहे की, आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी पीएनबी ईएमव्ही नसलेल्या एटीएम मशीनमधून १ फेब्रुवारीपासून व्यवहार करण्यापासून बंदी घालेल. बँकेने म्हटले आहे की, वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता पीएनबीने हे पाऊल उचललेय. जेणेकरून ग्राहकांचे पैसे सुरक्षित असतील. 1 फेब्रुवारीपासून ईएमव्हीशिवाय ग्राहक एटीएममधून आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत.

EMV नॉन एटीएम असे असतात, ज्यात व्यवहाराच्या वेळी एटीएम कार्ड मशीनमध्ये जास्त काळ ठेवावे लागत नाहीत. यात डेटा चुंबकीय पट्टीद्वारे वाचला जातो. याशिवाय EMV एटीएममध्ये व्यवहार होईपर्यंत काही सेकंदांसाठी कार्ड लॉक स्वरूपात ठेवावे लागते. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना पीएनबीने अ;ॅपद्वारे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड चालू/बंद करण्याची सुविधा दिली आहे. आपण आपले कार्ड न वापरल्यास आपण ते बंद करू शकता. असे केल्याने आपल्या बँक खात्यात ठेवलेले आपले पैसे सुरक्षित राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top