Sunday, 24 Jan, 8.58 am महाराष्ट्र देशा

राजकारण
प्रकृती आणखी ढासळल्याने लालूंना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवले.

नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कारागृहातून रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र लालूंवर चांगले उपचार व्हावे यासाठी लालूंना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जेल अधीक्षक वीरेंद्र भूषण यांच्या परवानगीनंतर शनिवारी रात्री लालूंना एम्सच्या कार्डियो न्युरो सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं.

लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झाल असून, चेहऱ्यावर सुज झाली आहे, त्यांची एक किडनी देखील खराब झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि राज्याचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली.

यासंदर्भात अधीक्षक वीरेंद्र भूषण यांनी केंद्रीय कारागृह होटवार जेल अधीक्षकांना पत्र लिहिले असून यामध्ये त्यांनी चारा घोटाळा मध्ये शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव यांना उपचारासाठी एका महिन्याची परवानगी देण्यात आली आहे. या कालावधी शनिवारी सुरू झाला. तर त्यानंतर देखील आणखी कालावधी देण्याची आवश्यकता असल्याचा विचार केला जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

यावेळी लालू जेलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निगराणी मध्ये असतील. त्याचबरोबर लालूंना अॅडमीट करण्याची जबाबदारी जेलच्या अधिक्षकांवर असेल, तर उपचारानंतर लालूंना जेल मध्ये परत आणण्याची जबाबदारी रांचीच्या एस एस पी यांची असेल. त्याच बरोबर या संदर्भात तिहार जेल च्या महानिर्देशकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top