Friday, 18 Oct, 12.42 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
राज्यात धोबीपछाड देणारा एकाच पैलवान : देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दोन दिवसच राहिले आहेत. प्रचारसभेची रणधुमाळीही शिगेला पोहचली आहे. त्यात भाजपा-राष्ट्रवादी एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आता ”राज्यातील निवडणुकीच्या आखाड्यात पैलवान कोण यावरुन दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. तेल लावलेला पैलवान तयार आहे पण लढायला कोणी तयार नाही, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्र्यांना तितकच सडेतोड उत्तर होतं.

गेल्या काही दिवसांपासून सोशल कुरघोड्या करणारा रम्या नावाच काल्पनिक पात्र मीडियाच्या माध्यमातून विरोधकांना धारेवर धरत आहे. निवडणुकीच्या प्रचारात पैलवान शब्दावरून मोठ रणकंदन माजलं आहे. यावर रम्याने ” गेल्या ४७ वर्षात देवेंद्र फडणवीसच आपला पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री आहेत. शिवाय त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

तसेच गेल्या ५ वर्षात सरकार अस्थिर करण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण विकासाची प्रक्रिया कुठेही थांबू न देता सगळ्या पैलवानांना फडणवीसांनी त्यांच्याच आखाड्यात असा धोबीपछाड दिला आहे. तर काहीजण थकल्याभागल्याची भाषा करायला लागले आहेत, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.मतदानाला आता फक्त दोनच दिवस राहिले असताना प्रचाराचा जोरही वाढला आहे. आरोप प्रत्यारोपांमुळे प्रचारसभेत कुस्तीचा आखाडा चांगलाच रंगला आहे.

”आम्ही नटरंग नाही, त्यामुळे हातवारे करत नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पवारांना सांगितले. तर त्यावर ”आता बाळा तुझा पैलवान तयार आहे का?” असं विचारात पवारांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा चिमटा काढला. .तसेच पैलवान नाहीत तर पंतप्रधानांपासून सगळेच केंद्रीय नेते महाराष्ट्रात प्रचाराला कसे येत आहेत. ” असाही प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचारला होता.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>