Wednesday, 07 Aug, 11.58 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
'राज्यावर नैसर्गिक जलआपत्ती ओढवली असताना सत्ताधारी नेते प्रचारयात्रा काढण्यात व्यस्त'

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात गेल्या दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही शहर आणि जिल्हे हे पाण्याखाली गेले आहेत. अशी विदारक परिस्थिती असताना देखील सत्ताधारी पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. यावरून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे.

राज्याच्या बहुतांश भागावर नैसर्गिक जलआपत्ती ओढवली असताना सत्ताधारी भाजप व शिवसेना प्रचारयात्रा काढण्यात व्यस्त आहेत. हे असंवेदनशिलतेचे लक्षण आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी प्रचार यात्रा रद्द करुन पूरग्रस्तांना मदत पोहचविण्यास प्राथमिकता द्यावी. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख मदत द्यावी आणि पीडितांना विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेवर आहेत. या यात्रेत फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधत आहेत. तर गेल्या ५ वर्षात सरकारने केलेल्या कामाची पावती देत आहेत. मात्र राज्यावर अशी आपत्ती आली असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे विरोधकांनी फडणवीस यांना लक्ष केले आहे.

ठरलं तर मग ! युतीत केवळ 103 जागांवर होणार 50-50 जागावाटप

सवलती नको आरक्षण मिळालं पाहिजे; धनगर समाज महासंघाची मागणी

एवढा हताश, निराश झालेला विरोधीपक्ष इतिहासात पहिल्यांदा पाहिलाय – फडणवीस

मी जनतेचा जनादेश घ्यायला आणि हिशेब द्यायला यात्रेवर निघालोय : देवेंद्र फडणवीस

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top