Saturday, 14 Dec, 5.54 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
राष्ट्रवादीला जास्तीचे मंत्रिपद मिळण्याचे अजित पवारांनी दिले संकेत

टीम महाराष्ट्र देशा : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांचा आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरचा राष्ट्रवादीचा पहिलाच कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात अजित पवार येणार असल्याने सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते अजित पवारांच्या भाषणाकडे त्यामुळे दादा काय बोलतात याची कार्यकर्ते वाट बघत होते.

ग्रामपंचायत निवडणुकांची पद्धती, नगरपालिका तसेच महानगरपालिकांच्या सध्याच्या प्रभागपद्धती बाबत त्यांनी सविस्तर भाष्य केले. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या थेट सरपंच व नगराध्यक्ष निवडणूक तसेच महापालिकांमधील प्रभागपद्धतीबाबत नव्या सरकारकडून फेरविचार केला जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी यावेळी संगीतले.

खाते वाटपात सहकार व पणन ही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. त्यामुळे बाजार समित्याबाबत अनेक नवे बदल करणे शक्यता असल्याचे पवार यांनी सांगितले. सहकारी कारखानदारीच्या धोरणाबाबतही सरकार काही बदल करण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दहा आमदार निवडून आले आहेत. ज्यात तीन आमदारांमागे एक मंत्रीपद याप्रमाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला तीन मंत्रीपदे मिळू शकतात अशी शक्यता अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे तात्पुरते खातेवाटप झाले असले तरी राष्ट्रवादीच्या वाट्याला आणखी एक मंत्रीपद मिळू शकते, असे संकेत पवार यांनी दिले.

त्याचप्रमाणे खाते वाटपात सहकार व पणन ही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बाजार समित्याबाबत अनेक नवे बदल करणे शक्यता आहे, सहकारी कारखानदारीच्या धोरणाबाबतही सरकार काही बदल करण्याची शक्यता असल्याचे पवार यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top