Tuesday, 04 Aug, 2.27 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी?

मुंबई – मुंबईत आज पावसाचा जोर असल्याने भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी तातडीने महापालिका मुख्यालयात जाऊन आपत्कालीन कक्षाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबईत आज अनेक भागात पाणी साचले असून दरड ही कोसळली आहे. त्यात दुपारी समुद्राला मोठी भरती असल्याने भितीचे वातावरण आहे. त्यामुळे आमदार अँड आशिष शेलार यांनी आज महापालिका मुख्यालयात जावून आपत्कालीन कक्षाकडून आढावा घेतला.

कोरोनामुळे आपत्कालीन कक्षात प्रवेश निषेध करण्यात आला असून आपत्कालीन कक्षाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांची पालिकेतील भाजप कार्यालयात भेट घेऊन आमदार अँड आशिष शेलार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी ? असा सवालही यावेळी त्यांनी आयुक्तांना केला आहे.

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून मुंबईतील हिंदमाता परिसराची पाहणी, महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून त्यांचं काम सुरु आहे, आवश्यक असेल तरच बाहेर पडा,असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

नक्की वाचा -

युपीएससी २०१९ चा निकाल जाहीर! अभिषेक सराफ महाराष्ट्रात पहिला

काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या देखील कोरोना बाधित

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top