Monday, 24 Feb, 9.06 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
शरद पवार यांनी प्रतिज्ञापत्र दिलेले आहे ; त्यांना साक्ष देण्यासाठी बोलवू : न्यायमूर्ती जे.एन.पटेल

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांना आयोगाने समन्स बाजवावे असा अर्ज अॅड.प्रदीप गावडे यांनी केला होता. त्यावर आज कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने म्हटले की ;शरद पवारांनी प्रतिज्ञापत्र दिलेले आहे, त्यांना साक्ष देण्यासाठी बोलवू असे न्यायमूर्ती जे.एन.पटेल यांनी सांगितले.

शरद पवारांनी आयोगासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहिती व्यतिरिक्त अतिरिक्त माहिती त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेत दिली होती. म्हणून त्यांना समन्स बजावून सदर माहिती चौकशी आयोगासमोर देण्यासाठी बोलविण्यात यावे अशी मागणी वकील गावडे यांनी केली होतीआज सागर शिंदे यांनी वकील गावडे यांच्या मार्फत आयोगास चौकशीस उपयोगी ठरेल अशी काही माहिती दिली.

एल्गार परिषद गुन्ह्यातील आरोपी सुधीर ढवळेचा २०१७ मध्ये औरंगाबाद येथे एल्गार परिषद आयोजित करणारे भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान; च्या वतीने लोकांसमोर केलेल्या प्रक्षोभक भाषणाचा काही भाग २७ जानेवारी, २०२० रोजी ABP माझा या वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आला.त्यानुसार भाषण करताना सुधीर ढवळे म्हणाले, &..तेंव्हा याचं मागचे जे सरकार होतं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं त्यांनी नक्षलवादी ठरवलं होतं आमच्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना. आंबेडकरी चळवळीमध्ये नक्षलवादी घुसले म्हणत होते. आता त्यांनी माणसं मारायची, त्यांनी आपल्या माया बहिणींची लख्तरं वेशीवर टांगायची, बलात्कार करायचे, आरोपी पकडत नाही तर आपण काय करायचे? आपण रस्ते रोखायचे कि नाही ? आपण बस जाळायच्या कि नाही? हे केल्याशिवाय सरकार काहीच करत नाही.

ढवळेंचे … आपण बस जाळायच्या कि नाही? हे केल्याशिवाय सरकार काहीच करत नाही… हे भाष्य पाहता हिंसा केल्याशिवाय सरकार काहीच करीत नाही असे त्यांचे विचार दिसून येतात. ढवळे ३१ डिसेंबर २०१७ ला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदचे आयोजक असून हिंसक संविधानविरोधी मार्गाने काम करणाऱ्या प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपाखाली अटक आहेत. त्यांनी केलेल्या भाषणातून एल्गार परिषदेच्या निमित्ताने काही दिवस आधीपासून भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानाने समाजात प्रक्षोभक भाष्य करून वेगळे वातावरण तयार केल्याचे दिसते. म्हणून याची कोरेगाव भीमा दंगलीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.

सुधीर ढवळेसह एल्गार परिषद गुन्ह्यातील इतर काही आरोपींना ही २००७ ते २०१३ या कालावधीत राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार असताना नक्षलवादाच्याच गुन्ह्यात अटक झाली होती. दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात ( ATS काळाचौकी पोलीस स्टेशन CR No १९/२०११) समोर आले कि, पुणे जिल्ह्यात २००९ मध्ये १५ दिवसाच्या प्रतिबंधित संघटनेच्या नक्षलवादी प्रशिक्षण कार्यक्रम झाला व त्यात माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे व अन्य काही आरोपी सहभागी झाले. मिलिंद तेलतुंबडे एल्गार परिषद गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी असून तो व या गुन्ह्यातील अन्य काही आरोपी या नक्षलवादी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. राज्याच्या विधानसभेत सदर नक्षलवादी प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत उपस्थित प्रश्नांना उत्तर देताना एप्रिल १३, २०१२ रोजी तत्कालीन गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आर.आर.पाटील यांनी निवेदन सादर केले. त्यात पुणे जिल्ह्यात सदर नक्षलवादी प्रशिक्षण कार्यक्रम झाला व त्यात मिलिंद तेलतुंबडे सहभागी झाल्याचे पुरावे उलब्ध आहेत असे नमूद केले आहे.

वढू बुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्काराबाबत वादग्रस्त इतिहास सांगणारा फलक स्थानिक गायकवाड कुटुंबीयांनी २८ डिसेंबर २०१७ रोजी लावला. या वादग्रस्त फलकातून निर्माण झालेला वाद १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा हिंसाचाराचे निमित्त ठरले आहे. वादग्रस्त फलकामुळे २९ डिसेंबर २०१७ रोजी दोन समाजात वाद निर्माण झाला, वादग्रस्त फलक काढण्यात आला आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले. वाद निवळून शांतता व सलोखा निर्माण व्हावा म्हणून पोलिस, प्रशासन, स्थानिक लोक प्रयत्न करीत असताना २९ डिसेंबर २०१७ रोजी बामसेफ – भारत मुक्ती मोर्चा संबंधित कार्यकर्त्यांनी वढू बुद्रुक गावात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीवार दगडफेक करून प्रचंड तणाव निर्माण करून वढू बु व कोरेगाव भीमा परिसरात एक वेगळे वातावरण तयार केले. याबाबत गुन्हा दाखल आहे (CR No. 689/18, Shikrapur police station) सदर गुन्ह्यातील आरोपी कुमार काळे, सचिन बनसोडे हे बामसेफ – भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते आहेत. इतर आरोपींमध्ये काही जण हे वादग्रस्त इतिहास सांगणारा फलक लावणाऱ्या गायकवाड कुटुंबीयांपैकी आहेत याची नोंद घ्यावी.

याच बामसेफ – भारत मुक्ती मोर्चा संबंधित लेखक विलास खरात यांनी आपल्या ;१ जानेवारी ‘१८१८ स्वातंत्र्याचे बंड’ पुस्तकात खोटा इतिहास व जातीवादी, प्रक्षोभक मांडणी करून दंगली पेटू शकतात, पेशवाई बुडाल्याच्या २०० व्या वर्षानिमित्त मोठा जनउद्रेक उफाळेल असे भाष्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हत्या त्यांची पत्नी सविता कबीर, पंडित जवाहरलाल नेहरू, गोळवलकर, श्रीपाद अमृत डांगे, डॉ मालवणकर या ब्राम्हणांनी कट रचून योजनाबद्ध पद्धतीने केली, असे विकृत लेखन या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र आयोगासमोर दाखल आहे. या पुस्तकास बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमुख वामन मेश्राम यांची प्रस्तावना आहे. याच बामसेफ ने एल्गार परिषदेला पाठिंबा दिला. बामसेफचा पाठिंबा असल्याचे एल्गार परिषदेतच घोषित ही केले गेले होते याची नोंद घ्यावी.

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर कोरेगाव भीमा हिंसाचाराचा गुन्हा दाखल करणाऱ्या अनिता सावळेंची उलट तपासणी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर पूर्ण झाली आहे. सावळेंच्या तक्रारीत आरोपींनी हिंसाचार घडवून आणल्याचे ;आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे; असे म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात हिंसाचाराच्या ठिकाणी "काही लोकांनी भिडे, एकबोटे रस्त्यावरून जात असल्याचे सांगितले", असे म्हटले आहे. मात्र उलट तपासणीत भिडे, एकबोटे दोघे ही हिंसाचाराच्या दिवशी वढू बु, कोरेगाव भीमा परिसरात नव्हतेच, सावळेंनीही त्यांना पहिले नव्हते आणि ते तिकडे फिरत असल्याच्या अफवा पसरविल्या गेल्या यास सावळेंनी दुजोरा दिला आहे. तसेच भिडे, एकबोटे यांच्या संघटनांबाबत ही त्यांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. सावळेंची साक्ष पाहता त्यांची तक्रार खोटी, संशयास्पद वाटू लागते. असे असताना कोरेगाव भीमा हिंसाचाराचे खरे सूत्रधार शोधणे कामी चौकशीस आयोगास उपयोग होईल अशी काही माहिती आम्ही सादर करीत आहोत.

अशा आशयाची माहिती न्यायालयासमोर दिल्यामुळे आता न्यायालयासमोर शरद पवारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top