Tuesday, 17 Sep, 2.49 am महाराष्ट्र देशा

देश-विदेश
शरद पवारांभोवती देशाचे राजकारण फिरते, त्यामुळेचं त्यांच्यावर टीका होतेय

टीम महाराष्ट्र देशा : पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? असा सवाल शरद पवारांना आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? असं सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ‘शरद पवार हे राजकारणातले भीष्म आहेत. कारण गेली ५० वर्षांपेक्षा जास्त काळ शरद पवार यांच्या भोवतीच फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचे राजकारण फिरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असतील, विरोधक असतील, बाळासाहेबांनंतरची पिढी असेल सर्वच जण शरद पवारांवर टीका करत आहेत असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना ‘इतिहास काढायचा झाला तर आम्हाला काढतां येतो १९७७ चा इतिहास काढला तर सर्वांनाच त्रास होईल, पण जखमेवरची खपली काढायची नसते. इतिहासाचे दाखले द्यायचे झाले तर अनेक रक्तवाहिन्या भळा भळा वाहतील. स्वाभिमानाच्या गोष्टी कोणीही करायच्या नसतात शरद पवारांचा स्वाभिमान इंदिरा गांधी, मुरली देवरा, मनोहर जोशी, सुधीर जोशी यांना माहिती होता असं विधान केले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत पक्षांतर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. नेते सोडून गेल्यामुळे शरद पवारांनी हे विधान केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top