Sunday, 24 Jan, 9.20 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
शिवसेना आमदाराच्या गोलंदाजीवर उर्मिला मातोंडकरांची फटकेबाजी !

मुंबई : २ महिन्यांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर त्या शिवसेनेत सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज त्या दिंडोशीतील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दिंडोशीमध्ये अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा 'आमदार चषक 2021′ आयोजित करण्यात आलं आहे.

यावेळी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू हे देखील उपस्थित होते. उर्मिला मातोंडकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी आमदार सुनील प्रभूंनी चेंडू हातात घेऊन गोलंदाजी केली. तर, मातोंडकर यांनी फलंदाजी करत चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी उपस्थितांमध्ये देखील चांगलाच उत्साह संचारला होता.

‘इथे क्रिकेट खेळताना आणि पाहताना आयपीएल आणि सर्व एकत्र झाल्यासारखं वाटलं. एवढ्या कमी ओव्हरमध्ये इतकी मजा येईल, मजेशीर मॅच होईल असं मला वाटलं नव्हतं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वाचं अभिनंदन आणि आयोजकांचे खूप धन्यवाद. आमदार सुनील प्रभू यांनी गोलंदाजी करुन मला फलंदाज करुन टाकलं.’ अशी प्रतिक्रिया देखील उर्मिला मातोंडकर यांनी दिली. एवढंच नाही तर, मी फकीर एक अभिनेत्री, राजकारणी नसून आता क्रिकेटर देखील आहे, हे भारतीय महिला क्रिकेट टीमने लक्षात ठेवावं, असं मिश्किल भाष्य केल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top