Saturday, 14 Dec, 6.10 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
त्यावेळी उद्धव ठाकरेंचा मला फोन आला. म्हणाले, 'पंकजा काळजी करू नको'

टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावरच्या भाषणाने राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण केलं होतं. त्यानंतर भाजपमध्ये सगळचं काही अलबेल नाही ही चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी अनेक गोष्टींवर स्पष्टीकरण दिलंय.

पराभव झाल्यानंतर मी लगेच तो मान्य केला. माझ्या विरोधात सगळे एकत्र आले हीच माझी शक्ती आहे. मी गोपीनाथ मुंडें प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच काम करणार. कारण शेवटी काम करण्याचं स्वातंत्रही महत्त्वाचं असतं. मी हे काम करणं कसं सोडून देऊ. मला आता काहीच नको. अस पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

तर दुसरीकडे, पराभूत झाल्यावर इतक्या धावपळीत उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून सांत्वन केलं. "तू पराभूत झाली याच वाईट वाटलं, पण काळजी करू नकोस" अस उद्धव ठाकरे बोलल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष चालावे अस मला वाटत तर आपण आता विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी अस देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

भाजपने वंजारी समाजाला जास्त तिकीटं द्यायला पाहिजे होते. उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबीक संबंध आहेत. ते संबंध राजकारणापलिकडे आहेत. मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं कधीच म्हटलं नाही. त्या वक्तव्यामुळे मला फायदा झालं की नुकसान हे भविष्यात कळेलच. अस देखील त्या म्हणाल्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top