Friday, 13 Sep, 11.10 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
'वंचित बहुजन आघाडीचा अकोल्याबाहेर एकही आमदार निवडून येणार नाही'

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच नेते मंडळी चांगलेच सक्रीय होताना दिसत आहे. निवडणूक काही दिवसांवर आली असताना देखील नेते मंडळीचे पक्षांतराचे सत्र सुरु आहे. तसेच मोर्चेबांधणी, राजकीय दौरे, गाठीभेटी यांसारख्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला दिसत आहे.

तसेच निवडणुकीच्या तोंडावर मात्र सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर चांगलाच शाब्दिक निशाणा साधला आहे. यावेळी आठवले म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, या मताशी मी सहमत नसून अकोल्यामध्ये त्यांचे एक-दोन आमदार निवडून येतात, पण बाहेर त्यांचा एकही आमदार निवडून येणार नाही. त्यामुळे त्यांचा विरोधी पक्षनेता होईल असे शक्य नसल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.

याच पार्श्वभूमीवर आठवले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत वेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला भरभरून मते मिळाली मात्र विधानसभा निवडणुकीत हे चित्र पाहायला मिळणार नाही. नेतेच नाही तर खालच्या पातळीवर बरेचसे कार्यकर्ते त्यांच्याकडे वळले होते तेही आता आमच्या पक्षात परत आले असे रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपची ताकद वाढवण्यासाठी महाजनादेश यात्रेवर आहेत. तसेच निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' ही रयतेचा आवाज बुलंद करण्यासाठी शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ही यात्रा काढली आहे. तसेच राष्ट्रवादीचे खा. उदयनराजे यांचा देखील भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. खा. उदयनराजे यांचा भाजप प्रवेश 14 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top