कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या अन्नदान उपक्रमात नऊ दिवस बाहेरगावच्या ७५ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
(75,000 devotees availed the benefits of the Mahalaxmi Annachhatra)
महालक्ष्मी अन्नछत्राच्यावतीने नियमित बाहेर गावच्या पर्यटकांसाठी अन्नछत्राची सेवा दिली जाते. पण नवरात्र उत्सवात भाविकांची वाढती संख्या लक्षात अन्न्छत्राच्या वेळेत वाढ करुन भाविकांना सेवा दिली जाते. यावर्षी नवरात्रोत्सवात नऊ दिवस मसाले भात, भाजी, आमटी, खीर आणि ताक अशा महाराष्ट्रीयन सात्विक महाप्रसादाचा आस्वाद देश-विदेशातून आलेल्या अंबाबाईच्या भाविकांनी घेतला. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने शेजारील हॉल उपलब्ध करुन दिला होता. (75,000 devotees availed the benefits of the Mahalaxmi Annachhatra)
महालक्ष्मी अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. अन्नछत्राचे नियोजनात स्वत: अध्यक्ष राजू मेवेकरी, संजय जोशी, राजेश सुगंधी, एस. के. कुलकर्णी, सुनील जोशी, ॲडव्होकेट तन्मय मेवेकरी, आदित्य मेवेकरी, ऋतुराज सरनोबत, प्रतीक गुरव, रजत जोशी, प्रशांत तहसीलदार, सतीश सरनाईक, चंद्रशेखर घोरपडे, विराज कुलकर्णी, सुनील खडके, अंकित भोसले, प्रथमेश कुलकर्णी, अनिल व्हटकर आदी सर्व स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले. (75,000 devotees availed the benefits of the Mahalaxmi Annachhatra)

