Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार; दोन संशयित ताब्यात

अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार; दोन संशयित ताब्यात

जमीर काझी : मुंबई : नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असतानाच प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर रविवारी जुहू येथे गोळीबार करण्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुरक्षित असून त्यांच्या हाताला आणि छातीला किरकोळ दुखापत झाली आहे.

हल्याच्या शोधासाठी १२ पथके नेमण्यात आली असून दोन संशयितांना सुरतकडे जाणाऱ्या रेल्वेतून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. एकूण तीन हल्लेखोर असून बिश्नोई टोळीने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. (Shooting incident involving actor Tiger Shroff in Mumbai)

कारच्या दिशेने पाच फायर

पुष्पापार्क येथील मैदानाजवळ एका मोटरसायकलीवरून आलेल्या तिघाजणांनी त्याच्या गाडीच्या दिशेने पाच फायर केले. या हल्ल्यात त्याचा वाहन चालक व एक रिक्षाचालक जखमी झाला असून या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिस्नोई गॅंगने घेतली आहे. बॉलीवूडमध्ये आमचे न ऐकणाऱ्यावर व सलमान खान याच्या समवेत काम करणाऱ्या सर्वांना संपवू, असा इशारा बिश्नोई टोळीतील अनिल पंडित याने ऑडिओ क्लिप व सोशल मीडियावर पोस्ट करून दिला आहे. (Shooting incident involving actor Tiger Shroff in Mumbai)

फुटबॉल खेळून घरी परतताना हल्ला

या प्रकरणामुळे बॉलीवूडसह मुंबईत सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा आणि पोलिसांच्या अस्तित्वाचा प्रश्नही चव्हाट्यावर आला आहे. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो जुहुतील पुष्पा पार्क मैदानावर फुटबॉल खेळून घरी परतत होता. त्याच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी चाहते त्याच्या गाडीजवळ थांबले होते.तो गाडीत बसत असताना मोटर सायकल वरून आलेल्या तिघां जणांनी त्याच्या गाडीच्या दिशेने ५ फायरिंग केले. आणि ते सुसाटवेगाने निघून गेले. अकस्मितपणे काही क्षणात घडलेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडून धावपळ उडाली. हल्ल्यात टायगर श्रॉफचा ड्रायव्हर व तेथे असलेला रिक्षा चालक यांना गोळी लागून जखमी झाले . सुदैवाने या घटनेत टायगरला कोणतीही दुखापत झाली नसून तो सुरक्षितपणे बचावला. गोळीबारच्या घटनेनंतर काही वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित नागरिकांनी या घटनेच्या व्हिडिओ घेतला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

खाली वाकल्याने टायगर श्रॉफ वाचला

हल्ल्यात टायगर श्रॉफ खाली वाकल्याने तो वाचला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच्या हाताला आणि छातीला काच लागली आहे. कारचा चालक जखमी झाला आहे. हल्लेखोर पळून गेल्यानंतर टायगर श्राफ कारमधून उतरला आणि स्वत: स्टेअरिंगवर बसला आणि कार सांताक्रुझ पोलिस ठाण्यात नेली. त्यानंतर चालकाला नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले.

सेलिब्रिटींना धमकावणे सुरुच

लॉरेन बिश्नोई टोळीकडून यापूर्वी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे तर सलमान खान यांच्या गॅलेक्सी या घरावर गोळीबार करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा हत्या तपास सुरूच असून त्यानंतरही बिश्नोई गँगने सातत्याने बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत आज टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याने त्यांची गांभीर्य आणखी वाढले आहे.

खासदार वर्षा गायकवाड, सचिन सावंतांची गृहखात्यांवर टीका

नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असताना झालेल्या या घटनेमुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई पोलिसांचा धाक राहिला नसून राजकारण्यांची अनागोदी कारभार जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. मुंबईत नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार, तसेच अनेक अभिनेते आणि निर्मात्यांना मिळणाऱ्या धमक्यांचा दाखला देत त्यांनी राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवला. कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा केला आहे. 'महाराष्ट्राचा बिहार झाला' असं म्हणण्याची वेळ आली होती, मात्र आता तर 'बिहार बरा' असं म्हणण्याची वेळ आल्याची बोचरी टीकाही सचिन सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये करताना मुंबईला गुन्हेगारांच्या दहशतीत ढकलणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, असे म्हणत त्यांनी आपल्या एक्स मीडिया पोस्टमधून सरकारवर निशाणा साधला.

तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांनी थेट गृह विभागाला जबाबदार धरले .मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून आधी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि आता अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार देशाच्या आर्थिक राजधानीत एकापाठोपाठ एक अशा घटना घडत असतील, तर मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही? मुंबईकरांच्या सुरक्षिततेबाबत सरकार आणि गृह विभागाने उत्तर द्यावे, असे त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Shooting incident involving actor Tiger Shroff in Mumbai)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman