Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिनेते राज किरण यांच्या बेपत्ता होण्याचे २3 वर्षांनंतरही गूढ

अभिनेते राज किरण यांच्या बेपत्ता होण्याचे २3 वर्षांनंतरही गूढ

Maharashtra Dinman 3 weeks ago

वी दिल्ली : ऐंशीच्या दशकातील अभिनेते राज किरण हे २००३ पासून बेपत्ता असून, त्यांचं गायब होणं आजही बॉलिवूडमधील सर्वात गूढ प्रकरणांपैकी एक मानले जाते. आता अभिनेत्री सोमी अलीने त्यांचा शोध घेण्याची मोहीम पुन्हा वेगाने सुरू केली असून, खात्रीशीर माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

(Raj Kiran missing for 2३ years)

गेली १६ वर्षे राज किरण यांचा शोध

सोमी अली यांनी सोशल मीडियावर काही कागदपत्रे, छायाचित्रे आणि प्रतिज्ञापत्र शेअर करत सांगितले की, त्या गेली १६ वर्षे राज किरण यांचा शोध घेत आहेत. हा केवळ शोध नसून दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.त्यांनी लिहिले, “एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मी चिंटूजींना वचन दिले होते की, राज किरण यांचा शोध घेणे कधीही थांबवणार नाही. १६ वर्षे झाली, तरी मी आजही त्यांचा शोध घेत आहे.” (Raj Kiran missing for 2३ years)

न्यूयॉर्कपर्यंत पोहोचला शोध

सोमी अली यांनी सांगितले की, खासगी तपास अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांना अनेक पत्ते मिळाले. त्या न्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंटपर्यंतही पोहोचल्या. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की राज किरण तेथे कधीच राहत नव्हते. मात्र, त्यांचे भाऊ गोबिंद महतानी, त्यांची पत्नी जूडी आणि मुलगी सुमारे ११ वर्षे त्या अपार्टमेंटमध्ये राहत होते.सोमी अली यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी राज किरण यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.

विश्वासार्ह माहिती देणाऱ्याला बक्षीस

सोमी अली यांनी लोकांना आवाहन केले आहे की, जर कोणाकडे राज किरण यांच्याबाबत खात्रीलायक माहिती असेल-ते एखाद्या मानसिक आरोग्य केंद्रात असोत किंवा अन्यत्र राहत असोत-तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. योग्य आणि विश्वासार्ह माहिती देणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.त्यांनी शेअर केलेल्या कागदपत्रांमध्ये राज किरण यांचे जुने छायाचित्र, त्यांची माहिती आणि अमेरिकेत त्यांचा शोध घेताना तयार करण्यात आलेल्या नोंदींचा समावेश आहे.

प्रतिज्ञापत्रात काय दावा?

सोमी अली यांनी शेअर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दावा करण्यात आला आहे की, राज किरण २००३ पासून बेपत्ता आहेत. त्यांचा शेवटचा ठावठिकाणा अमेरिकेतील अटलांटा (जॉर्जिया) येथे असल्याचे समोर आले होते. त्यांच्या मानसिक आरोग्याबाबत यापूर्वीही काही अहवाल प्रसिद्ध झाले होते.राज किरण यांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेतील स्थानिक प्रशासन, खासगी तपास अधिकारी आणि वैद्यकीय संस्थांचीही मदत घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

अनेक दावे, पण रहस्य कायम

राज किरण यांच्या बेपत्ता होण्याबाबत गेली अनेक वर्षे वेगवेगळे दावे केले जात आहेत. एके काळी ऋषी कपूर आणि चित्रपटसृष्टीतील काही व्यक्तींनी राज किरण अमेरिकेतील अटलांटा येथील एका मानसिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असल्याचे सांगितले होते.

मात्र, नंतर राज किरण यांची मुलगी ऋषिका महतानी यांनी हा दावा फेटाळून लावला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडिलांचा आजपर्यंत कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही आणि ते मानसिक आरोग्य केंद्रात असल्याची माहिती चुकीची आहे. यामुळे आजही राज किरण नेमके कुठे आहेत, हे रहस्य कायम आहे.

सोमी अली यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा राज किरण यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना केली आहे, तर काहींनी या प्रकरणाला बॉलिवूडमधील सर्वात गूढ बेपत्ता प्रकरणांपैकी एक म्हटले आहे. (Raj Kiran missing for 2३ years)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman