Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे मुंबई धडक मारणार

ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे मुंबई धडक मारणार

जालना : प्रतिनिधी : ऐन गणेशोत्सवात मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहेत. १५ सप्टेंबरला ते अंतरवालीतून मुंबईकडे कूच करणार असून १९ सप्टेंबरला ते मुंबईत पोहोचणार आहेत.

आझाद मैदानावर सकाळी दहा वाजता आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. (Jarange’s call for the ‘Chalo Mumbai’ march)

मनोज जरांगे यांनी मराठी बांधवांना 'चलो मुंबई' अशी हाक दिली आहे. आज शनिवारी अंतरवाली सराटीत उपोषणस्थळी त्यांनी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली. २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्याबाबत राज्य सरकारकडून मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. १२ सप्टेंबरला मुंबई आंदोलनाबाबत घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सरकारकडून त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आज त्यांनी चलो मुंबई चा नारा दिला आहे. (Jarange’s call for the ‘Chalo Mumbai’ march)

मनोज जरांगे यांनी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदीच्या आधारे सर्व पात्र मराठी बांधवाना तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करावे अशी मागणी केली आहे. हैद्राबाद गॅझेटिअरनुसार मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, सातारा आणि कोल्हापूर संस्थान गॅझेटिअरची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. मराठा आणि कुणबी समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी सरकाकडून स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी अशी मागणी केली आहे.

मनोज जरांगे मंगळवारी १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहेत. पहिला मुक्काम पाटोदा (बीड) येथे होणार आहे. १६ सप्टेंबरला दुसरा मुक्काम अहिल्यानगरातील श्रीगोंद्याला, १७ सप्टेंबरला पुण्यातील हडपसर येथे तिसरा मुक्काम तर चौथा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असणार आहे. १९ सप्टेंबर रोजी पाचव्या दिवशी मुंबईत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. (Jarange’s call for the ‘Chalo Mumbai’ march)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman