Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अखेर सीबीएसई अध्यक्ष राहूल सिंग आणि सचिव गुप्तांची बदली

अखेर सीबीएसई अध्यक्ष राहूल सिंग आणि सचिव गुप्तांची बदली

वी दिल्ली : सीबीएसई परिक्षेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या ऑन स्क्रीन मार्किंग संबधीत घोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) अध्यक्ष राहूल सिंग आणि मंडळाचे सचिव हिमांशू गुप्ता यांची बदली केली.

ऑन स्क्रीन मार्किंगच्या संबधित संपूर्ण प्रणालीसाठी आवश्यक सेवांच्या खरेदीची चौकशी करण्यासाठी सरकारने एक सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. (Transfer of CBSE Chairman and Secretary)

सीबीएसई १२ वीच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यमापन पूर्णपणे डिजिटल ऑन स्क्रीन मार्किंग प्रणाली करण्याचा निर्णय या वर्षापासून घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना अनेक चुका झाल्याने विद्यार्थ्यांनी या प्रणालीच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. उत्तरपत्रिकेच्या स्कॅन केलेल्या प्रती अस्पष्ट दिसत होत्या. काही विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेतील काही पूर्णपणे गायब होती. तर काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका दाखवण्यात आल्या होत्या. (Transfer of CBSE Chairman and Secretary)

नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणानंतर सीबीएसई परीक्षेचा घोळ पुढे आल्याने विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहूल गांधी यांनी या प्रक्रियेचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या बदलीची मागणीही विरोधकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसईचे अध्यक्ष राहूल सिंग आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. (Transfer of CBSE Chairman and Secretary)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman