Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंडरवर्ल्डच्या हल्यांतून बॉलिवूड मुंबईबाहेर हलवण्याचे षडयंत्र : हर्षवर्धन सपकाळ

अंडरवर्ल्डच्या हल्यांतून बॉलिवूड मुंबईबाहेर हलवण्याचे षडयंत्र : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई सोडून इतर राज्यांत किंवा देशाबाहेर स्थलांतर करण्याच्या विचारात आहे, ही महाराष्ट्रासाठी मोठी सांस्कृतिक आणि आर्थिक हानी आहे.

गुजरातमधील साबरमतीच्या तुरुंगात बसून गुंड जर थेट चित्रपटसृष्टीला नियंत्रित करत असतील, तर पोलीस यंत्रणा व भाजपा महायुती सरकार नेमके करतेय तरी काय? सत्ताधाऱ्यांच्या राजकीय पाठबळाशिवाय गुंडांची एवढी हिंमत वाढणे अशक्य आहे, असे गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केला. (A conspiracy to move Bollywood out of Mumbai)

केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन ते म्हणाले की, मुंबईत चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांच्यावर खुलेआम हल्ले होत आहेत. धमक्या येत आहेत. टायगर श्रॉफ, सलमान खान, रोहित शेट्टी यांच्यावर हल्ले झाले आणि इतर अभिनेते या माफियांच्या निशाण्यावर असल्याच्या बातम्या येत असून संपूर्ण बॉलिवूड दहशतीखाली वावरत आहे. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनला थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी करावी लागणे ही महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेची अत्यंत लाजीरवाणी शोकांतिका आहे. या गंभीर परिस्थितीला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यास फडणवीस पूर्णपणे असमर्थ ठरले आहेत.

महायुतीने सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावलाय.

मुंबईतील बॉलिवूड दुसरीकडे घेऊन जाण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तसे जाहीरपणे सांगितले होते, त्यामुळेच असे हल्ले वाढत आहेत का ? कलाकारांवर गोळीबार होत असताना आणि बॉलिवूड मुंबई सोडून इतर ठिकाणी जाण्याच्या तयारीत असताना, भाजपा महायुतीने सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याचेही त्यांनी म्हटले. (A conspiracy to move Bollywood out of Mumbai)

ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

.शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याणचे उपविभाग प्रमुख नसरु शेख यांनी आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत ठाणे जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे सरचिटणीस अस्लम सोयान, रईस शेख, मोईनुद्दीन शेख, मुस्ताक चौधरी, सानिया अशरफ, सचिन जाधव, साजन गायकवाड यांनीही प्रवेश केला.. यावेळी कल्याण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवीन सिंग व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (A conspiracy to move Bollywood out of Mumbai)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman