Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक

भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक

Maharashtra Dinman 4 months ago

मुंबई : प्रतिनिधी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज बुधवारी भाजप प्रदेश कार्यकारणी जाहीर केली. कोल्हापुरचे कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

तसेच प्रदेश कार्यकारणीत उपाध्यक्षपदी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना संधी मिळाली आहे. भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी योगेश टिळेकर तर कोषाध्यक्षपदाची जबाबदारी मिहीर कोटेचा यांच्याकडे दिली आहे. नवनाथ बन यांना पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Krishnaraj Mahadik appointed as BJP Youth Morcha President)

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली नव्हती. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमुळे ही प्रक्रिया रेंगाळली होती. आज प्रदेश कार्यकारिणीला मुहुर्त लागला. रवींद्र चव्हाण यांच्या टीममध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. त्यामध्ये कोल्हापुरातील कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड झाली. कृष्णराज महाडिक हे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव तर भाजप आमदार अमल महाडिक यांचे पुतणे आहेत. (Krishnaraj Mahadik appointed as BJP Youth Morcha President)

प्रदेश कार्यकारिणी अशी, उपाध्यक्ष : अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कौंडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रविण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे, अर्चना पाटील चाकूरकर.

सरचिटणीस,:निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे.

चिटणीस: प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय फुके, वर्षा ढहाळे, संजय जनाटे, संजय जगताप, अर्चना डेहनकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी, भैरवी वाघ.

कोषाध्यक्ष मिहीर कोटेचा, सह कोषाध्यक्ष अरुण लखानी, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, मुख्यालय सह प्रभारी विश्वास पाठक, किसान मोर्चा रामकृष्ण वेताळ. ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर, एस.सी. मोर्चा अध्यक्ष देवराव होळी, भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष नरेंद्र पवार, अल्पसंख्याक मोर्चा इद्रिस मुलतानी. (Krishnaraj Mahadik appointed as BJP Youth Morcha President)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman