Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भाजपच्या ११४२ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

भाजपच्या ११४२ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

Maharashtra Dinman 2 weeks ago

वी दिल्ली : पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने दमदार कामगिरी करत १४४१ प्रभागापैकी ६७० जागांवर विजय मिळवला. केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता असलेल्या देशातील प्रथम क्रमांक पक्ष असलेल्या भाजपचा मात्र या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे.

त्याच्या ११४२ उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली आह. पंजाबमधील जनतेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. (Election Deposits of 1,142 BJP Candidates Forfeited)

एक महिन्यापूर्वी आमदार आदमी पक्षाच्या सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातील सहा खासदार हे पंजाबमधील होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली होती. पण पंजाबमधील जनतेने आपचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांच्या नेतृवावर विश्वास दाखवला. पंजाबमधील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे ६७० उमेदवार विजयी झाले. काँग्रेसने २७५ जागांवर तर अकाल दल पक्षाने २०३ जागा जिंकल्या. पण भाजपची कामगिरी अतिशय सुमार झाली. त्यांच्या ११४२ उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. (Election Deposits of 1,142 BJP Candidates Forfeited)

आम आदमी पक्षाने ४८ पैकी २४ स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसने तीन स्थानिक स्वराज्य संस्था तर अकाली दलाला सहा स्थानिक संस्थांवर समाधान मानावे लागले. भाजपला मात्र पंजाबी जनतेने नाकारले आहे. (Election Deposits of 1,142 BJP Candidates Forfeited)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman