Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दगडावरील फिंगरप्रिंट्स आधार कार्डशी लिंक होणार : चंद्रकांत पाटील

दगडावरील फिंगरप्रिंट्स आधार कार्डशी लिंक होणार : चंद्रकांत पाटील

Maharashtra Dinman 3 weeks ago

कोल्हापूर : प्रतिनिधी :दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लाठीमार आणि गोळीबाराचे आदेश दिले या राहूल गांधी यांच्या आरोपाचे खंडन करण्यासाठी भाजपचे नेते सरसावले आहेत.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहूल गांधी यांना पत्रकार परिषदेत इशारा दिला आहे. दिल्लीतील आंदोलनातील दगडफेकीतील प्रत्येक दगड पोलिसांनी गोळा केला असून त्यावर फिंगरप्रिंट्स आता कार्डशी लिंक होणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जेव्हा संसदेत या विषयावर सविस्तर उत्तर देतील तेव्हा विरोधकांची पोलखोल होईल, असा इशारा दिला. (Fingerprints found on the stone to be linked to Aadhaar cards)

राहूल गांधींना स्वत:चे दावे सिद्ध करावे लागतील

कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण आरोप खरंच असतात असे नाही. दिल्ली पोलिसांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन आंदोलनाचे विश्लेषण केले आहे. ज्यांना पकडलं आहे त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड, आंदोलनामागील हेतू स्पष्ट झाले आहेत. राहूल गांधी यांनी अमित शाहवर लाठीचार्जचे आरोप केले आहेत पण आता पोलिसांच्या पुराव्यासमोर त्यांनाही स्वत:चे दावे सिद्ध करावे लागतील असे आव्हान पाटील यांनी दिले आहे.

आंदोलक संसदेत घुसले असते तर …..

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला परदेशातून मदत मिळत असल्याची आणि समाजकंटक घुसल्याची महिती सरकारकडे होती असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. जोपर्यंत आंदोलक संसदेच्या दिशेने निघाले नाही तोपर्यंत प्रशासनाने त्यांना रोखले नाही. जर हे आंदोलक संसदेत घुसले असते तर देशाची काय स्थिती झाली असतील याचा विचार विरोधकांनी करावा, असंही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, राहूल चिकोडे उपस्थित होते. (Fingerprints found on the stone to be linked to Aadhaar cards)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman