Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिल्लीसारखा प्रयत्न केल्यास फटकावून काढणार ; राज ठाकरेंचा इशारा

दिल्लीसारखा प्रयत्न केल्यास फटकावून काढणार ; राज ठाकरेंचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २६ जुलै रोजी शिवाजी पार्क ते सिद्धी विनायक मंदिर असा मोर्चा काढण्याची घोषणा ठाकरे बंधूंनी केली.

दिल्लीतील मोर्चासारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावुन काढणार, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. (Press conference by the Thackeray brothers)

आमचा मोर्चा शांततेत

ठाकरे बंधूंनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. जंतरमंतर येथील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाआडून काही असामाजिक तत्व हे पोलिसांवर हल्ला करत आहेत, आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत याकडे लक्ष वेधले असता राज ठाकरे यांनी आमचा मोर्चा शांततेत असेल. त्यामध्ये कोणताही गोंधळ नसेल. इथे दिल्लीसारखा करण्याचा प्रयत्न केला तर आमचे लोक सोडणार नाहीत असा इशारा दिला. (Press conference by the Thackeray brothers)

राजीनाम्याचा विषय आता गृहमंत्रालयापर्यंत

राज ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारकडून विद्यार्थी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप करुन राज ठाकरे म्हणाले, केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार केला गेला. भाजप जेव्हा विरोधात होता तेव्हाही अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. रझा अकादीच्या विराधात जेव्हा मनसेने मोर्चा काढला होता त्यावेळी आम्ही पोलिस आयुक्तांचा राजीनामा मागितला होता. तेव्हा त्यांना हटवण्यात आले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. नीट पेपरफुटीची ही पहिली वेळ नाही. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्याची मागणी योग्यच आहे. आंदोलनात विद्यार्थ्यांना मारले आहे त्यामुळे हा प्रश्न धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता विषय उरलेला नाही. गृहमंत्रालयापर्यंत हा विषय आहे. (Press conference by the Thackeray brothers)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman