Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिल्लीत रेस्टॉरंटला आग; २१ जणांचा मृत्यू

दिल्लीत रेस्टॉरंटला आग; २१ जणांचा मृत्यू

Maharashtra Dinman 3 weeks ago

वी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीत एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. मृतामध्ये परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. २०० हून अधिक व्यक्तींना वाचवले असे पोलिसांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनेबददल दु:ख व्यक्त केले. (Fire at a Restaurant in Delhi; 21 Dead)

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरातील एका रेस्टॉरंटमध्ये पावनेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या घटनेची वर्दी मिळाल्यावर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी आले. त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तळमजल्यावर रेस्टॉरंट असून तिथे आग लागली आणि भडकली. (Fire at a Restaurant in Delhi; 21 Dead)

घटनास्थळी असलेल्या स्थानिक रहिवासी शेरखान यांनी सांगितले की मी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दुकानात जात असताना आग लागली. आगीचे प्रमाण सुरवातीला कमी होते. नंतर आग भडकत गेली. आगीच्या ज्वालांनी इमारतीला वेढले. इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशींना बचाव करण्यास संधी नव्हती. त्यावेळी स्थानिक लोकांनी रस्त्यांवर गाद्या पसरवल्या आणि त्यावर लोकांनी उड्या मारण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी आले आणि त्यांनी बचाव करण्यास सुरुवात केली. (Fire at a Restaurant in Delhi; 21 Dead)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman