Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एशियाड गेम्समध्ये ठाणे, कोल्हापूर, सोलापूरच्या शूटर्सकडून पदकांची कमाई

एशियाड गेम्समध्ये ठाणे, कोल्हापूर, सोलापूरच्या शूटर्सकडून पदकांची कमाई

वी दिल्ली : प्रतिनिधी : जपान देशातील नागोया अशियाई क्रीडा स्पर्धेत शूटिंगमध्ये भारतीय खेळाडूंची घोडदौड काम राहिली आहे. पहिल्याच दिवशी १० मीटर एअर रायफलमध्ये महिलांनी सांघिक रौप्य पदक पटकावले.

त्यानंतर पुरुषांनी आज दुसऱ्या दिवशी सोमवारी १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावले. रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, हिमांशु ढिल्लो आणि पार्थ राकेश माने यांच्या संघाने ही कामगिरी बजावली. रुद्रांक्ष पाटील ठाणे पालघरचा तर पार्थ माने हा सोलापूर जिल्ह्याचा खेळाडू आहे. काल भारतीय महिला संघाने रौप्य पदक पटकावले त्या संघात कोल्हापूरच्या सोनल मस्करनेही दर्जेदार कामगिरी केली. तिने सांघिक १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक पटकावले. रुद्रांक्ष पाटीलने वैयक्तिक ब्राँझ पदकाची कमाईही केली. मिश्र मार्शल आर्टस् मध्ये सुचिता तारियालने ब्राँझ पदक मिळवले. भारताची पदकाची संख्या सहावर पोचली आहे. (India wins silver in shooting at the Asian Games)

रुद्रांक्ष पाटीलने पटकावले सांघिक रौप्य, वैयक्तिक ब्राँझ

आज सोमवारी झालेल्या पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात चीनने सुवर्णपदक पटकावले तर भारताने रौप्य पदकाची कमाई केली. दोन्ही संघात ८.९ गुणांचा फरक राहिला. रुद्रांक्ष, हिमांशु आणि पार्थने एकत्रित १८९०.०१ गुणांची कमाई केली. दक्षिण कोरियाने ब्रॉझ पदक मिळवले. रुद्रांक्ष पाटीलने चमकदार कामगिरी करताना ६३१.८ गुणांची कमाई केली. हिमांशु ढिल्लोने ६३० तर पार्थ मानेने ६२३८.३ गुण मिळवून भारताला रौप्य पदक मिळवून दिले. वैयक्तिक प्रकारात हिमांशु ढिल्लनने रौप्य तर रुंद्राक्ष पाटीलने ब्राँझ पदक पटकावले.

इलोवेनिल पटकावले सांघिक आणि वैयक्तिक रौप्य पदक

काल रविवारी भारताच्या महिला संघाने १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदकावर नाव कोरले होते. इलावेनिल वनारिवन, कोल्हापूरची सोनल मस्कर आणि विदर्सा विनोद यांनी सांघिक कामगिरीच्या जोरावर रौप्य पदकाची कमाई करत भारताला झकास सुरुवात करुन दिली. याच गटात वैयक्तिक प्रकारात इलोवेनिल वनारिवनने रौप्य पदकावर निशाना साधला. भारताची पदकांची संख्या तीन वर पोचली आहे. शूटिंगमध्ये भारताला आणखी पदक मिळण्याची आशा आहे. (India wins silver in shooting at the Asian Games)

कोल्हापूरच्या सोनल मस्करचे घवघवीत यश

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर या ग्रामीण भागातील सोनल मस्करने भारताला सांघिक रौप्य पदक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. आईवडिलांनी शूटिंगमध्ये प्रोत्साहन देताना रायफल खरेदीसाठी त्यांच्या वडिलांनी जमिनीचा तुकडा विकण्यासाठी मागेपुढे पाहिली नाही. आंतरराष्ट्रीय खेळाडू राधिका बराले हिच्या वेध अकॅडमीत तिचे प्रशिक्षण झाले. सध्या ती रेल्वेत सेवेत आहे.

मिश्र मार्शल आर्टस् मध्ये सुचिकाने भारताला प्रथमच पदक

सुचिका तारियालने भारताला प्रथमच पदक मिळवून दिले. महिलांच्या पारंपरिक ६० किलो एमएमए प्रकारात तारियालने ब्राँझ पदक मिळवले. या स्पर्धेतील भारताचे हे सहावे पदक ठरले आहे. अशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या या प्रकारात भारताला पहिलेच पदक मिळाले आहे. उपांत्य फेरीत ती सिंगापूरच्या तेओ हुई हूनकडून पराभूत् झाली. (India wins silver in shooting at the Asian Games)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman