Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोकुळ दूध संघ निवडणूक प्रक्रिया सुरू

गोकुळ दूध संघ निवडणूक प्रक्रिया सुरू

Maharashtra Dinman 3 months ago

कोल्हापूर : प्रतिनिधी : महायुतीतील मित्रपक्षाचे शह काटशहाचे राजकारण, न्यायालयीन प्रक्रिया, प्रशासकीय नियुक्ती यामध्ये रखडलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मंगळवारी २६ मे पासून ठराव मागवले जाणार आहेत. तर सभासद दूध संस्थांनी आपल्या प्रतिनिधींच्या नावे ठराव एक जुलैपर्यंत सादर करावे लागले आहेत. गोकुळची निवडणूक ९० दिवसात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. (Gokul Milk Union election process underway)

गोकुळची निवडणूक मतदार यादीतील हरकतीवरुन न्यायालयीन प्रक्रियेत अडकली होती. मतदार यादीतील १३२० दूध संस्थांना अवसायनाचे आदेश काढले होते. अवसायनात काढलेल्या संस्थांची सुनावणी प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक प्रकिया लांबल्याने राज्य सरकारने गोकुळवर प्रशासक नेमला आहे. सध्या पाच सदस्याचे प्रशासकीय मंडळ गोकुळचा कारभार पाहते. (Gokul Milk Union election process underway)

सर्वोच्च न्यायालयाने ९० दिवसात गोकुळची निवडणूक घेण्याची मागणी केल्याने माजी संचालकांनी केली होती. जिल्ह्यातील स्थानिक नेतेमंडळीकडूनही निवडणुकीबाबत हालचाली सुरू होती. त्यानंतर आज सोमवारी २५ रोजी दूग्ध विकास विभागाकडून निवडणूक प्रक्रिया संदर्भातील आदेश काढण्यात आला. दूध संस्थांना ठराव मागणी पत्रे पाठवणे, त्याकडून ठराव मागवणे, प्रारुप यादी प्रसिद्ध करुन हरकती घेऊन अंतिम मतदार यादी करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून सहायक निबंधक (दुग्ध) कोल्हापूर कृष्णा ठाकरे यांची नियुक्ती केली आहे. २६ मे ते १ जून २०२६ या कालावधीत सभासद दूध संस्थांना ठराव मागणी पत्रे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर २ जून ते १ जुलै या कालावधीत प्रतिनिधी नियुक्तीचा ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पाठवायचा आहे. (Gokul Milk Union election process underway)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman