Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवा; हळदीची गुणवत्ता तपासा

हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवा; हळदीची गुणवत्ता तपासा

पुणे: प्रतिनिधी : देशातील काही मूठभर व्यापारी एनसीडीईएक्स (NCDEX - वायदेबाजार) च्या माध्यमातून हळदीचे दर मुद्दाम पाडत असून, यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान होत आहे.

या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट घेतली. राज्यातील सर्व वेअरहाऊस मधील हळदीची तातडीने गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी या वेळी शिष्टमंडळाने केली. (Check the quality of the turmeric)

हळदीचे दर पाडण्यासाठी व्यापाऱ्यांची युक्ती

बाजारपेठेत हळदीचे दर पाडण्यासाठी व्यापाऱ्यांनी एक नवी युक्ती शोधली आहे. राज्यातील विविध वेअरहाऊस (वखार) मध्ये काही व्यापाऱ्यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाची हळद साठवून ठेवली जात आहे. वायदेबाजारात मालाची डिलिव्हरी देण्याची वेळ येते, तेव्हा हीच निकृष्ट दर्जाची हळद पुढे करून हळदीचे मार्केट डाऊन केले जाते. या कृत्रिम मंदीमुळे हक्काचा आणि दर्जेदार माल पिकवणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला मात्र अत्यंत कमी दरात आपली हळद विकावी लागत आहे. (Check the quality of the turmeric)

व्यापाऱ्याकडून वायदेबाजारात दर पाडण्याचा प्रयत्न

यंदाच्या वर्षी देशभरात हळदीचे उत्पादन घटले आहे. वास्तविक पाहता चालू वर्षी हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २५ ते ३० हजार पर्यंत दर मिळणे अपेक्षित होते. मात्र संगनमताने देशातील हळदीच्या व्यापाऱ्यांनी वायदेबाजारात दर पाडण्याचा प्रकार सुरू केला आहे. यामुळे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हापोलिस प्रमुख, अन्न औषध प्रशासन विभाग , वखार महामंडळाचे अधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक या सर्वांनी एकत्रित धाडी टाकून हळदीची गुणवत्ता तपासण्याची मागणी शेट्टी यांनी केली. (Check the quality of the turmeric)

सांगली, हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

गेल्या दोन महिन्यांपासून हिंगोली व सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व जिल्हापोलिसप्रमुख यांना लेखी तक्रारी करूनही कारवाई न केल्याने शेट्टी यांनी प्रशासनाच्या या भुमिकेबद्दल आर्थिक हितसंबंधाची शंका व्यक्त केली. यावर वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला. वेअरहाऊस मधील हळदीच्या गुणवत्तेबाबत तातडीने चौकशी करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. (Check the quality of the turmeric)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman