अमरावती : प्रतिनिधी : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. ३६ बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
रविवारी मध्यरात्री सव्वातीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (Fire at the Neonatal Intensive Care Unit of the Amravati)
आगीतून बालके बाहेर काढताना परिचारकांचे हातही भाजले
प्राथमिक माहितीनुसार एका व्हेटिंलेटरमध्ये अचानक स्फोट झाल्याने किंवा थर्मल युनिलमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे. आग लागली तेव्हा एनआयसीयू मध्ये ३९ बालके उपचार घेत होती. ज्या कक्षात आग लागली तिथे ९ बालके होती. आग लागताच ताबडतोब डॉक्टर, नर्सेस, इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत तत्परता दागवत ३६ बालकांना बाहेर काढले. आगीतून बालके बाहेर काढत असताना काही परिचारकांचे हातही भाजले आहेत. वाचवण्यात आलेल्यापैकी सहा बालकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांना जवळच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहेत. त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
मृत बालकाच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
घटनास्थळी काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी पहाटेच ताबडतोब भेट दिली. त्यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना फायर ऑडिट केले नसल्याची शंका व्यक्त केली आहे. दोषींवर कारवाईची त्यांनी मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याच आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडून मृत बालकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
अग्निशमन यंत्रणा आणि वैद्यकीय उपकरणाच्या देखभालीमध्ये त्रुटी
रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा आणि वैद्यकीय उपकरणाच्या देखभालीमध्ये त्रुटी असल्याचे आरोप स्थानिक नेत्यांकडून करण्यात आला आहे. सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर आणि सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी केली जात आहे. अमरावतीचे पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. (Fire at the Neonatal Intensive Care Unit of the Amravati)
पालकमंत्री बावनकुळेंना दु:ख
अमरावतीचे पालकमंत्री आणि महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. एक्स पोस्टवर त्यांनी असे म्हटले आहे की, अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो. माझे मन हेलावून गेले आहे.दगावलेल्या नवजात बालकांना अतिशय व्यथित अंतःकरणाने श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांच्या पालकांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देवो, अशी प्रार्थना करतो.या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिले आहेत. जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जात असून, त्यांना लवकर आराम पडावा अशी सुविधा दिली जात आहे. मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे असून, सरकार व प्रशासन संपूर्ण मदत करत आहे.मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे चार वाजता लागलेल्या आगीत उपचार घेत असलेल्या तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. काही बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांपैकी चार बालकांवर उपचार सुरू असून, एक गंभीर आहे.
आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही.एसएनसीयूमध्ये कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर उपचार सुरू असतात. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या घटनेचे तीव्र दुःख व्यक्त करतो. (Fire at the Neonatal Intensive Care Unit of the Amravati)

