Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
झिनेदीन झिदानचा मुलगा अल्जेरियाकडून खेळणार

झिनेदीन झिदानचा मुलगा अल्जेरियाकडून खेळणार

पॅरिस : फ्रान्सचा प्रसिद्ध माजी फुटबॉलपटू झिनेदिन झिदानचा मुलगा लुका झिदान हा फ्रान्सऐवजी अल्जेरिया संघातून फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. गोलरक्षक असलेल्या लुका झिदानची अल्जेरियाचा अंतिम संघात निवड झाली आहे.

अल्जेरियाचे मुख्य प्रशिक्षक व्लादिमीर पेटकोविच यांनी अंतिम संघ निवड केला असून २५ सदस्यांच्या संघात लुका झिदानची निवड करण्यात आला आहे. २८ वर्षीय लुका झिदान सध्या ग्रानाडा सीएफकडून खेळतो. (Zinedine Zidane’s son to play for Algeria)

लुकाचे वडिल झिनेदिन झिदान यांनी १९९८ मध्ये फ्रान्सला फिफा विश्वचषक जिंकून दिला होता. फ्रान्सच्या फुटबाल इतिहासात झिनेदिन झिदान यांची प्रतिष्ठित व्यक्ती व खेळाडू म्हणून मानले जाते. झिनेदीन झिदान हे मुळचे अल्जेरियाचे असले तरी त्यांची जडणघडण फ्रान्समध्ये झाली आहे. पण लुकाचा प्रवास वेगळा ठरला आहे. फ्रान्समध्ये जन्मलेल्या लुका झिदान युवा स्तरावर फ्रान्सचे प्रतिनिधीत्व केले होते. पण फ्रान्ससाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळल्यामुळे फिफाच्या नियमानुसार त्याला क्रीडा राष्ट्रीयत्व बदलून दुसऱ्या पात्र देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. (Zinedine Zidane’s son to play for Algeria)

झिनेदीन झिदानचे पालक १९५३ मध्ये अल्जेरियातील काबिलिया प्रदेशातून फ्रान्समध्ये स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे लुका अल्जेरियन नागरिकत्वासाठी पात्र ठरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला 'लेस फेनेक्स' चे प्रतिनिधीत्व करण्याची परवानगी मिळाली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये लुकाला अल्जेरियाच्या राष्ट्रीय संघात सहभागी झाला. त्याने सहा सामन्यात अल्जेरियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या वर्षीच्या सुरवातीला तो अफ्रिका कप ऑफ नेशन्समध्येही खेळला होता. अल्जेरियाला नायजेरियाकडून २-० असा पराभव पत्करावा लागला.

फिफा विश्वचषक स्पर्धा २०२६ साठी अल्जेरियाने १० सामन्यात आठ सामने जिंकून युगांडापेक्षा सात गुणांनी आघाडी घेत अव्वल स्थान प्राप्त करत विश्वचषकाचे तिकीट मिळवले. हा संघ पाचव्यांदा विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. अल्जेरिया जे गटात असून या गटात गतविजेता अर्जेटिना, ऑस्ट्रिया आणि जॉर्डन हे संघ आहेत. (Zinedine Zidane’s son to play for Algeria)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman