Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोर्टात महिलेला मारहाण, १५ वकिलांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

कोर्टात महिलेला मारहाण, १५ वकिलांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Maharashtra Dinman 4 months ago

कोल्हापूर : प्रतिनिधी : घटस्फोटाच्या खटल्यातील एका महिलेला जातीवाचक शिव्या देऊन मारहाण केल्याप्रकरणी कोल्हापूरातील १५ वकिलांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये मुंबई आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष विवेक घाटगे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व्ही.आर.पाटील यांच्या समावेश झाला आहे.सात मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीतील तळमाजल्यावरील झेरॉक्स सेंटर परिसरात ही घटना घडली.

(Atrocity Case Filed Against 15 Lawyers)

ॲड. काजल शेळके, ॲड मनिषा सातपुते, ॲड साक्षी निकम, ॲड हर्षा खंडेलवाल, ॲड संदीप चौगुले, ॲड व्हीआर. पाटील, ॲड संदीप देशपांडे, ॲड नारायण भांदिगरे, ॲड विवेक घाटगे, ॲड सुरज भोसले, ॲड स्वाती तानवडे, ॲड तृप्ती किनरे, ॲड विद्या कांबळे देशमुख, ॲड जे.जे. देसाई, ॲड शिल्पा सुतार अशी गुन्हा नोंद झालेल्या वकिलांची नावे आहेत. (Atrocity Case Filed Against 15 Lawyers)

अश्विनी उर्फ पल्लवी निखिल पाटील (वय ३० रा. वारणा कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी अश्विनी पाटील यांनी पती निखिल याच्याविरोधात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. सात मार्च रोजी कोर्टात सुनावणी होती. यावेळी कोर्टाच्या आवारात अश्विनी यांनी पत्नी निखिल यांचा हात धरुन त्यांच्याकडे कपडे, गॅस शेगडी या साहित्याची मागणी केली. यावेळी ॲड काजल शेळके यांनी अश्विनी यांना जातीवाचक शिविगाळ केली. तुमची भीक मागायची लायकी आहे म्हणून निखिलकडे भीक मागत आहेस, असे म्हणत म्हणून ॲड शेळके यांनी अश्विनीच्या कानशिलात लगावली. तिच्या गालातून रक्त आले. तसेच हिरकणी कक्षाच्या काचेवर हात मारुन काचा फोडण्याचा प्रयत्न केला. हा गोंधळ ऐकून कोर्ट परिसरातील वकील आले. त्यांनी अश्विनीला बाहेर काढा, ही वकिलांना मारते, हिला मस्ती आले आहे असे म्हणून जातीवाचक शिविगाळ केली. तसेच काजल शेळके यांच्या मदतीसाठी आलेल्या वकिलांनी तिला आमच्या ताब्यात द्या, तिला आम्हाला मारायचे आहे, तिच्यावर गुन्हा दाखल करा, तिचे वकीलपत्र कुणीही घ्यायचे नाही अशी जातीवाचक शिविगाळ केली. फिर्यादी अश्विनी पाटीलच्या तक्रारीवरुन शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Atrocity Case Filed Against 15 Lawyers)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman