नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारतीय लष्कराच्या सरावादरम्यान रणगाड्याखाली सापडून दोन जवानांचा दुर्दवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी घडली. हरियाणातील हिसार जिल्ह्यातील भोजराज गावाजवळ ही घटना घडली.
(Two jawans were found dead under a tank in Hisar Bhojrao village)
हिसार जिल्ह्यात भोजराज गावात भारतीय लष्कराचा सराव सुरू आहे. सरावात ३२ रणगाडे सहभागी झाले होते. रणगाड्याच्या हालचालीमुळे मोठी धुळ उडाली होती. त्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यावर रणगाडा चालकाला तैनात असलेले जवान दिसले नाहीत. दोन जवानांच्या अंगावरुन रणगाडे गेले. त्यामध्ये नायक मनिष कुमार (रा. शामली, उत्तर प्रदेश), नायक अंकुश कुमार (रा. बदायूं, उत्तर प्रदेश) हे दोघे जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हिसार येथील लष्कारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. दोन्ही जवानांचे शवविच्छेदन करण्यात अले. लष्करी छावणीतच त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. (Two jawans were found dead under a tank in Hisar Bhojrao village)
शहीद मनीष कुमार सात वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते. त्यांचे वडील रामबीर हे कॅप्टन होते. दीड वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. अंकुश पटेल हे २०१० मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांना १२ वर्षाची मुलगी आणि सहा वर्षाचा मुलगा आहे. (Two jawans were found dead under a tank in Hisar Bhojrao village)

