जमीर काझी : मुंबई : महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. राज्यात रोज महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी मंडळ ( एनसीआरबी) ताज्या अहवालामध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे.
विधानसभेत आज यावर चर्चा करताना विरोधकाने राज्य सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. (Maharashtra ranks second in crimes against women)
राज्यात बलात्काराच्या ८६४३ घटना
महाराष्ट्रात २०२५ मध्ये महिला अत्याचाराचे ४७ हजार ९५४ गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच महिला अत्याचारात देशात दुसरा क्रमांक असल्याचा अहवाल ही समोर आला आहे. त्यामध्ये राज्यात बलात्काराच्या ८६४३ घटना घडल्या होत्या. तर तर २०२४ मध्ये ७ हजार ९४० घटनांची नोंद झाली होती. ताज्या अहवालानुसार २०२५ मध्ये बालकांवरील अत्याचाराच्या घटनांत ४८२ ने वाढ झाली आहे. ही राज्यासाठी निश्चितच चिंतेची बाब म्हटली पाहीजे. (Maharashtra ranks second in crimes against women)
कोल्हापूर परिक्षेत्रात महिला अत्याचाराच्या सर्वात जास्त घटना
एनसीआरबीच्या २०२४ अहवालानुसार महिला अत्याचाराचे ४७९५४ गुन्हे नोंद झाले आहे.महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं हा अहवाल सांगतो. कोल्हापूर परिक्षेत्रात २०२४-२५या दोन वर्षांत महिला अत्याचाराच्या २३६२ आणि विनयभंगाच्या ४४८५ घटना घडल्या आहेत. राज्यात याच भागात महिलांवर जास्त अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. तर अहिल्यानगरमध्ये २०२४-२५ दरम्यान अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या ६४१ घटना घडल्या आहेत. तर २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत ४१ प्रकरणे समोर आली आहेत.
बदलापूर, नसरापूर अत्याचार प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
यावेळी फडणवीस यांनी उत्तर देताना बदलापूर व नसरापूर अत्याचार प्रकरणांत गुन्हे दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. राज्यात महिला सुरक्षेसाठी ५१ भरोसा सेल, ५८ फास्ट ट्रॅक न्यायालये, दामिनी पथके, हेल्पलाईन व विशेष तपास पथके कार्यरत असल्याचं ही त्यांनी सांगितलं. शक्ती कायद्याच्या तरतुदींचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा नव्या फौजदारी कायद्यांमध्ये करण्यात आल्याची माहिती विधानसभेत दिली. (Maharashtra ranks second in crimes against women)

