Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माजी महापौरांच्या नातवाची आत्महत्या

माजी महापौरांच्या नातवाची आत्महत्या

कोल्हापूर : प्रतिनिधी : शनिवार पेठेतील राहत्या घरी रौनक इंद्रजीत आडगुळे या १७ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. तो माजी महापौर महादेवराव आडगुळे यांचा नातू आणि मुंबई हायकोर्टातील वकील अभिजीत आडगुळे यांचा पुतण्या आहे.

रौनक यांनी टोकाचा निर्णय घेतल्याने शनिवार पेठ परिसरासह शहराला मोठा धक्का बसला आहे. (Former Mayor’s grandson commits suicide)

रौनक हा बारावी इयत्तेत आहे. तो शांत आणि मनमिळावू होता. माजी महापौर आडगुळे यांचे शनिवार पेठेतील सोन्या मारुती मंदिराच्या पिछाडीस टाऊन हॉलजवळील कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर तीन मजली घर आहे. त्या ठिकाणी रौनक हा आई, वडील, बहिण आणि आजोबासह राहतो. सध्या महादेव आडगुळे हे आजारी आहेत. काल मंगळवारी रात्री त्याने आजोबांना औषधही दिले. तसेच तो आजोबांजवळ रात्री झोपतो असे म्हणत होता. पण आडगुळे यांना ताप असल्याने त्यांनी त्याला माझ्यामुळे तुलाही ताप येईल असे सांगून त्याच्या खोलीत झोपण्यास सांगितले. त्यानंतर तो वरच्या खोलीत झोपण्यास गेला. (Former Mayor’s grandson commits suicide)

आज पहाटे किचनमधील फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे घरातील सर्वांना धक्का बसला. ही माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शेंडा पार्क येथे नेण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. (Former Mayor’s grandson commits suicide)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman