Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मंदिराचा सभा मंडप कोसळून सात भाविकांचा मृत्यू

मंदिराचा सभा मंडप कोसळून सात भाविकांचा मृत्यू

रभणी :परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आहे. तीस जण जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहे.

(Seven devotees died in Parbhani)

यशवाडीतील हनुमान मंदिरात शनिवारी दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्या असते. आज शनिवारी सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी होती. मुख्य मंदिरासमोरील सभगृहात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. मंदिरात शेकडो भाविक असताना अचानक दुपारी सभागृहाचे छत कोसळले. यावेळी मोठा आवाज झाला. भाविकांनी आरडाओरड करत पळ काढला. कोसळलेल्या सभा मंडपाच्या छताखाली अनेक भाविक दबले गेले. स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली भाविकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सात भाविकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर तीसहून अधिक भाविकांना उपचारास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. (Seven devotees died in Parbhani)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman