Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मी राजीनामा देणार नाही : ममता बॅनर्जी

मी राजीनामा देणार नाही : ममता बॅनर्जी

Maharashtra Dinman 1 month ago

कोलकोता : मी राजीनामा देणार नाही. मी हरलेलो नाही. मी राजभवनात जाणार नाही. प्रश्नच उद्भवत नाही. मी हे सांगू इच्छितो की आम्ही निवडणूक हरलेलो नाही. आम्हाला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हरवण्याचा प्रयत्न गेला आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

(Mamata Banerjee refuses to resign)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीचा निकाल सोमवारी लागला. त्यामध्ये ममता बॅनर्जी स्वत: हरल्या आणि तृणमुल काँग्रेसचा मोठा पराभव करुन भाजपने पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवला. त्यानंतर आज मंगळवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. (Mamata Banerjee refuses to resign)

ममता बॅनर्जी पत्रकार परिषदेत म्हणाल्या. मला अतिशय खेदाने सांगावं लागत आहे की लोकांचे घटनात्मक हक्क आणि इव्हीएम लुटून निवडणूक आयोग पश्चिम बंगालच्या निवडणुकीत खलनायक झालं आहे. मतदानानंतर ईव्हीएम ८० ते ९० टक्के चार्ज कसे? हे कोणी सांगू शकेल का? हे शक्य आहे का? असा सवालही करत त्यांनी ईव्हीएम ४० टक्क्यांनच्या खाली यायला हवेत. मला मतदान केंद्रात प्रवेश करु दिला नाही. केंद्रीय दल आणि निवडणूक अधिकाऱ्यामार्फत आमच्या कार्यकर्त्यांचा छळ केला. मला बाहेर ढकलण्यात आले. आमच्या एजंटला मारहाण करण्यात आली, असा आरोपही ममतांनी केला.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दोन दिवस अधी त्यांनी आमच्या लोकांना अटक करायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी छापे टाकले. आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यांनी त्यांच्या मर्जीतील लोकांना नेमले. निवडणूक आयोगाशी संगनमत करुन भाजपने खेळ खेळला. तरीही आम्ही या संपूर्ण यंत्रणेविरुद्ध लढलो. असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्याचा हस्तक्षेप…. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री थेट हस्तक्षेप करत आहेत. त्यांनी एसआयआरच्या माध्यमातून ९० लाख नावे मतदार यादीतून वगळली. त्याविरोधात आम्ही न्यायालयात गेलो. तेव्हा ३२ लाख नावांचा समावेश करण्यात आला. त्यांनी घाणेरडे आणि नीच राजकरण केले अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली.

माझ्याकडे खूर्ची नाही. मी सर्वसामान्य व्यक्ती… मतमोजणीनंतर सोनिया गांधी, राहूल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांनी फोन केले. इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांनी मला सांगितले की ते पूर्णपणे माझ्यासोबत आहेत आगामी काळात इंडिया आघाडीची एकता आणखी मजबूत होईल. आता माझ्याकडे खूर्ची नाही. म्हणून सर्वसामान्य व्यक्ती आहे. त्यामुळे तुम्ही मला म्हणू शकत नाही की मी पदाचा गैरवापर करत आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी घालवले असून गेल्या १५ वर्षात मी माझ्या पेन्शनमधून एक पैसाही घेतलेला नाही असेही त्या म्हणाल्या. (Mamata Banerjee refuses to resign)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman