Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मॉडेल ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात दुसऱ्यांदा पोस्टमोर्टम होणार

मॉडेल ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात दुसऱ्यांदा पोस्टमोर्टम होणार

वी दिल्ली : नोएडामधील ३३ वर्षी अभिनेत्री आणि मॉडेल 'मिस पुणे' ट्विशा शर्माने आत्महत्या केल्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी ट्विशाची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप केला आहे.

या प्रकरणात तिच्या मृतदेहाचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. (Twisha Sharma’s body is set to undergo a second post-mortem examination)

मॉडेल ट्विशा शर्माचा डिसेंबर २०२५ मध्ये भोपाळचे वकील समर्थ सिंह यांच्याशी विवाह झाला. ट्विशाच्या सासू गिरीबाला सिंह या निवृत्त जिल्हा न्यायाधीश आहेत. १२ मे रोजी ट्विशाने गळफास लावून आत्महत्या केली. तिचा मृतदेह सासरच्या घरीच आढळला. ट्विशाने आत्महत्या केली आहे असा दावा सासरच्या लोकांनी केला तर माहेरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर १४ मे रोजी ट्विशाचा पती समर्थ सिंह, सासू गिरीबाला सिंह यांच्याविरोधात हुंडाबळी आणि मानसिक, शारीरिक छळाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पती समर्थ सिंह फरार झाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली. तसेच त्याच्यावर दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तो देश सोडून बाहेर पळून जाऊ नये यासाठी पासपोर्ट कार्यालयाचीही मदत घेण्यात आली. समर्थने अटक टाळण्यासाठी जामिनासाठी अर्ज केला होता. अखेर तो जबलपूर पोलिस ठाण्यात तब्बल दहा दिवसांनी शरण आला. भोपाळ पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. (Twisha Sharma’s body is set to undergo a second post-mortem examination)

ट्विशाचे व्हॉटस अप चॅट उघड… ट्विशाची व्हॉट्सॲप चॅटही व्हायरल झाली. त्यामध्ये तिने लिहिले होते की, आई, माझा जीव गुदमरतोय, हे लोक मला रडूही देत ​​नाहीत आणि हसायलाही कारण देत नाहीत. कुटुंबीयांनी असाही दावा केला आहे की, लग्नानंतर ट्विशाचा सातत्याने छळ केला जात होता. कुटुंबीयांनी या प्रकरणात निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. पण सासरच्या लोकांनी हे आरोप फेटाळले आहेत. ती गर्भवती होती. गर्भवती असल्याचे समजल्यानंतर ट्विशाची मानसिक स्थिती अस्थिर राहिली होती. तिला मूल नको असल्याने ती स्वत:ला इजा करुन घेत होती, असा दावा सासूने केला आहे.

दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याचे आदेश… शुक्रवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ट्विशा च्या मृतदेहाचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यास परवानगी दिली आहे. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. कुटुंबाच्या मागणीवरुन न्यायालयाने हा आदेश दिला आहे. (Twisha Sharma’s body is set to undergo a second post-mortem examination)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman