Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोदींच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी : राहूल गांधी

मोदींच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी : राहूल गांधी

Maharashtra Dinman 1 month ago

वी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी झाली आहे अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. राहूल गांधींच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak Under Modi's Watch)

नीट पेपरफुटीमुळे वीस लाखांहून अधिक वैद्यकीय शिक्षण घेऊन इच्छिणारा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. दोन वर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट पेपरफुटीमुळे मोठा धक्का बसला आहे. सीबीआयने नीट पेपरफुटीचा तपास सुरू केला असून आजतागायत १४ हून अधिक आरोपींना अटक केली आहे. पेपरफुटीनंतर केंद्र सरकारने नीट परीक्षा रद्द केली असून आता नव्याने २१ जून नीटची परीक्षा पुन्हा होणार आहे. (NEET Paper Leak Under Modi’s Watch)

नीट पेपरफुटीवरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे कान टोचले आहेत. केंद्र सरकारने न्यायालयाला आगामी नीट फेरपरीक्षेच्या निष्पक्षतेबाबत आश्वासन दिल्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी 'पंतप्रधान मोदी स्वत: नीट परीक्षेवर देखरेख करत आहेत असे विधान न्यायालयात केले. या विधानावर राहूल गांधी यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. राहूल गांधी यांनी पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'पंतप्रधान मोदींनी स्वत: नीट पेपरफुटीवर देखरेख केली होती" अशी टीका केली आहे. (NEET Paper Leak Under Modi’s Watch)

नीट परीक्षा पेपरफुटीमुळे देशभर नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक विद्यार्थी तणावात गेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman