Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुख्यमंत्र्याकडून कोल्हापुरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अहवाल करण्याच्या सूचना

मुख्यमंत्र्याकडून कोल्हापुरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अहवाल करण्याच्या सूचना

Maharashtra Dinman 2 weeks ago

मुंबई : प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनात कोल्हापूर येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करावे, असा लक्षवेधी प्रश्न विधीमंडळात आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज उपस्थित केला. यास लेखी निवेदन देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, नव्याने पोलीस आयुक्तालय निर्मितीचे परिपूर्ण निकष निश्चित करण्याचा अहवाल शासनास सादर करण्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयास सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच कोल्हापूर या घटक कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला असून विविध संवर्गातील ३१७१ पदे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती दिली. (Demand for a Police Commissionerate in Kolhapur)

१९८५ पासून पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव प्रलंबित

आमदार राजेश क्षीरसागर यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. कोल्हापूर शहर व जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांचा वाढता आलेख, वाढती लोकसंख्या आणि पोलीस दलावरील वाढता ताण लक्षात घेता कोल्हापूर येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. सन १९८५ पासून पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असून तो लालफितीत अडकून पडल्याची भावना जनतेमध्ये आहे. कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी, शैक्षणिक, औद्योगिक व धार्मिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे तसेच विविध राज्यांतील कामगारांच्या स्थलांतरामुळे लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे वाढते जाळे, खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, लूटमारी, खंडणी व इतर गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलातील मनुष्यबळ अपुरे असल्याने गुन्हे प्रतिबंध, तपास, वाहतूक व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखणे ही मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. याबाबत कोल्हापूर येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत शासनाने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली. (Demand for a Police Commissionerate in Kolhapur)

१३ पोलिस ठाण्याचा आयुक्तालय स्थापन करण्याचा प्रस्ताव

या प्रश्नास लेखी निवेदन देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील कोल्हापूर शहरामधील चार पोलीस ठाणी, शहरालगतची चार पोलीस ठाणी व इचलकरंजी शहरामधील तीन पोलीस ठाणी व हुपरी व हातकणंगले येथीलं दोन पोलीस ठाणी असा एकूण १३ पोलीस ठाण्यांचा समावेश करुन, कोल्हापूर येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. तथापि, राज्यात नव्याने पोलीस आयुक्तालय निर्माण करणेबाबत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालय स्तरावर निकष निश्चित करण्याची कार्यवाही चालू आहे. तसेच धोरण निश्चितीबाबत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाकडून नव्याने पोलीस आयुक्तालय निर्मितीबाबतचे परिपुर्ण निकष निश्चित करण्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयास कळविण्यात आले आहे. (Demand for a Police Commissionerate in Kolhapur)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman