Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई-पुणे रस्ता बंद, रेल्वेही ठप्प, विधानसभेचे कामकाजही स्थगित

मुंबई-पुणे रस्ता बंद, रेल्वेही ठप्प, विधानसभेचे कामकाजही स्थगित

Maharashtra Dinman 2 weeks ago

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईसह राज्यभर पडणाऱ्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असताना मुंबई-पुणे हा रस्ताही बंद झाला आहे. तसेच रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मुंबई पुणे रेल्वेसेवाही स्थगित करण्यात आली.

त्याचा फटका शेकडो प्रवाशांना बसला आहे. मुंबईत आज मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा दिल्याने पावसाळी अधिवेशानातील पहिल्याच दिवशी कामकाज स्थगित केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (Mumbai-Pune road closed)

मिसिंग लिंकच्या एक्झिटवर दरड कोसळली

नव्याने बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंकच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पहिल्याच पावसात बोगदा नंबर दोनच्या एक्झिटवर दरड कोसळल्याने कनेक्टिंक लिंक बंद करण्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वीच मिसिंग लिंकचे अतिशय धुमधडाक्यात महायुती सरकारने उद्घाटन केले होते. पण पहिल्याच पावसात एमएसआरडीसीएचे पितळ उघडे पडले आहे.मुंबई पुणे एक्सप्रेसवरील फूड मॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दोन्ही दिशेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पाणी ओसरल्यावर वाहतूक पूर्वतत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai-Pune road closed)

रेल्वे एक्सप्रेस रद्द

तसेच मुंबई पुणे घाट विभागात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेने सोमवारच्या मुंबई पुणे मार्गावरील सहा महत्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. पुणे एंटरसिटी एक्सप्रेस, पुणे डेक्कन एक्सप्रेस, पुणे डेक्कन क्विन, पुणे प्रगती एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मानखुर्दमध्ये चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यू

मुंबईत मानखुर्द मधील जनता नगर परिसरात तीन मजली चाळ कोसळली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. चाळ क्रमांक पाच मधील दोन ते तीन घरांचा भाग अचानक कोसळला. अग्निशमन दल, पोलिस आणि स्थानिक नागरिकांकडून बचावाचे काम सुरू आहे.

मुंबई गोवा महामार्ग बंद

कोकणात पावसाचे थैमान सुरू असून सलग सहा दिवस पाऊस पडत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर खेड पोलादपूर दरम्यान कशेडी घाटात दरड कोसळली. सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. जेसीबीने दरड हटवण्याचे काम सुरू आहे. (Mumbai-Pune road closed)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman