Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नीट २०२६ ची परीक्षा रद्द

नीट २०२६ ची परीक्षा रद्द

Maharashtra Dinman 2 months ago

वी दिल्ली : वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी महत्वाची असलेली नीट २०२६ ची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे परीक्षेस बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. तीन मे रोजी नुकतीच परीक्षा घेण्यात आली होती.

परीक्षेच्या आधी ४८ तास नीटचा पेपर फुटल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर देशभर पेपरफुटीची चर्चा सुरू आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली असून नव्याने नीटची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेची तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, अशी माहती राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीए कडून देण्यात आली आहे. (NEET 2026 Exam Cancelled. NEET Exam)

तीन मे रोजी देशभरात झालेल्या नीट परीक्षेला २२ लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षेची प्रश्नपत्रिका वेळेपूर्वीच फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. राजस्थानमधील अनेक विद्यार्थ्यंना प्रत्यक्ष परीक्षेत प्रश्नांशी जुळणारे हस्तलिखित पेपर मिळाले होते अशी माहिती समोर आली. त्यानंतर १० मे रोजी राजस्थान विशेष कृती गटाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत डेहराडून, सीकर, झुंझुनू येथून १३ संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये सीकरमधील एका कोचिंग संस्थेशी संबधित करिअर समुपदेशकाचा समावेश आहे. (NEET 2026 Exam Cancelled. NEET Exam)

तपासात असे आढून आले की ७२० प्रश्नांपैकी ६०० प्रश्न साधारणत: दोन दिवस आधीच सीकरमधील विद्यार्थ्यांना पोहोचले होते. केरळमधील एका कॉलेजच्या एमबीबीएस विद्यार्थ्याने एक मे रोजी सीकरमधील आपल्या मित्राला एक गेस पेपत पाठवला होता. त्यानंतर सीकरमधील एका पीजी चालकाला तो कागद मिळाला. त्यानंतर त्याने तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना हा गेस पेपर वाटला. त्यानंतर तो विविध लोकांपर्यंत पोहोचला.

विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या पेपरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांवरील ३०० हून अधिक प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न हस्तलिखित असून त्यांचे हस्ताक्षर एकसारखे आहे. यापैकी १५० प्रश्न नीट यूजी २०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांसारखेच आहेत. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या विशिष्ट अंदाजपत्रिकेतील प्रश्नांसारखेच काही प्रश्न येण्याची शक्यता असते, परंतु सहसा इतक्या मोठ्या संख्येने प्रश्न येण्याची अपेक्षा नसते. (NEET 2026 Exam Cancelled. NEET Exam)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman