नवी दिल्ली : प्रतिनिधी : पाकिस्तानच्या युद्धनौकेने भारतीय युद्धनौकेला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे नौदलाचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि कोणीही जखमी झाले नाही. १५ सप्टेंबर रोजी सारंकाळी उत्तर अरबी समुद्रात ही घटना घडली.
पाकिस्तानच्या या आगळकीचा भारताने निषेध केला असून पाकिस्तानच्या राजदुताला समन्सही पाठवले आहे. या घटनेनंतरही भारताने आपली समुद्री ग्रस्त कायम ठेवली आहे. (Pakistani warship violently collided with an Indian warship)
भारतीय नौदलाची कोलकोता-क्लास विनाशक युद्धनौका नियमित गस्त घालत होती. गस्त घालत असताना पाकिस्तान नौदलाची पीएनएस हुनैन ही युद्धनौका भारतीय जहाजाच्या दिशेने आली. भारतीय युद्धनौकेकडून सागरी रेडिओच्या संपर्कातून पाकिस्तान युद्धनौकेला वारंवार धोक्याचे इशारे देऊनही पाकिस्तान युद्धनौकेने जाणूनबुजुन निष्काळजीपणा दाखवला. या युद्धनौकेने भारतीय जहाजांजवळून वेगाने मार्ग कापण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाकिस्तानी युद्धनौकेचा पुढचा भाग भारतीय युद्धनौकेला घासून गेला.
भारताने पाकिस्तानच्या वर्तनावर टीका केली आहे. १९९१ च्या भारत पाकिस्तान संरक्षण करारातील कलम १० चे हे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे. या करारानुसार दोन्ही देशांच्या युद्धनौकानी आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात एकमेकांपासून किमान तीन सागरी मैल अंतर राखणे बंधनकारक आहे. भारताने पाकिस्तानी राजदूत सादर अहमद वारैच यांना तातडीने बोलावून घेत निषेध नोंदवला. (Pakistani warship violently collided with an Indian warship)
पाकिस्तानी युद्धनौकेने भारतीय नौदलाची क्षमता तपासणीसाठी किंवा चिथावणी देण्यासाठी जाणूनबुजुन ही ग्रे झोन रणनिती आखली आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (Pakistani warship violently collided with an Indian warship)

