Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पेट्रोल, डिझेल चौथ्यांदा महागले ; सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त

पेट्रोल, डिझेल चौथ्यांदा महागले ; सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त

वी दिल्ली : आखाती युद्धाचे चटके भारताला जाणवत असून सलग चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आठवड्याच्या सुरवातीला पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २.६१ रुपये तर डिझेलच्या दरात २.७१ रुपये वाढ झाली आहे.

सलग दहा दिवसात पेट्रोल,डिझेलच्या दरात अंदाजे प्रतिलिटर आठ रुपये वाढ झाली आहे. इंधन दरवाढीने सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (Petrol and diesel prices have risen for the fourth time)

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे इंधनाच्या दरात वाढ होणार याचे संकेत मिळत होते. पेट्रोलियम कंपन्यांनी १५ मे रोजी पेट्रोलच्या दरात तीन रुपये तर डिझेलच्या दरात ३.११ रुपयांची वाढ केली. त्यानंतर चारच दिवसात २० मे रोजी पेट्रोलच्या दरात ८६ पैसे आणि डिझेलच्या दरात ८३ पैसे वाढ केली. त्यानंतर शनिवारी सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८७ पैसे तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ झाली. तर आज सोमवारी सकाळी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २.६१ पैसे तर डिझेलच्या दरात २.७१ पैसे वाढ झाली आहे. या दरवाढीने महागाई वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीच्या विरोधात टीकास्त्र सोडले आहे. (

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोलच्या दरात गेल्या दहा दिवसात प्रतिलिटर आठ रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा फटका चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांना बसत आहे. डिझेलच्या दरवाढीने मालवाहतूक महाग होणार असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होणार असल्याने महागाई वाढणार आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होणार असल्याने शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येण्यासाठी शेतकरी दिवसरात्र काबाडकष्ट करत आहे. पण डिझेलच्या तुटवड्यामुळे ट्रॅक्टरची नांगरट आणि मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. (

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman