Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फुटबॉल वर्ल्डकपमध्ये चारही सामने ड्रॉ

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये चारही सामने ड्रॉ

वी दिल्ली :फिफा वर्ल्डकपमध्ये सोमवारी चारही सामने बरोबरीत राहिले आहेत. त्यामुळे जी गटातील चुरस वाढणार आहे. १५ जून १९५८ नंतर प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या एकाच दिवशी चारही सामने अनिर्णित राहण्याची घटना घडली आहे.

स्पेनला केप व्हर्डेने शून्यगोलबरोबरीत रोखले. तर इराणने न्यूझिलंडला २-२ बरोबरीत रोखले. सौदी अरेबिया आणि उरुग्वे तर इजिप्त आणि बेल्लियम यांच्यातील सामनेही १-१ अशा फरकाने सुटले. (All four World Cup matches ended in a draw)

बलाढ्य स्पेनला केप व्हर्डेने रोखले

विश्वचषक पदार्पण करणाऱ्या नवोदित संघ केप व्हर्डेने युरोपियन चॅम्पियन माजी विश्वविजेता स्पेन संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले. केप व्हर्डेचा ४० वर्षीय गोलरक्षक वोझिन्हा सामन्याचा हिरो ठरला. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या स्पेनच्या स्ट्रायकरच्या चढाया रोखण्यात त्याने चांगलीच बाजी लावली. ९५ मिनिटाच्या सामन्यात गोलरक्षक वाझिन्होने स्पेनची आक्रमणे रोखली. स्पेनने २७ शॉटस् टारगेटवर मारले. ११ कॉर्नर मिळवले. ७०० हून अधिक पास दिले पण केप व्हर्डेने स्पेनची डाळ शिजू दिली नाही. लॅमिन यमाल, डॅनी ओल्मो, निको विल्यम या दिग्गज खेळाडूंच्या चढाया केप व्हर्डेने रोखल्या. पाच लाख ३० हजार लोकसंख्या असलेला कोप व्हर्डेचा हा संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला तिसरा संघ आहे. सामन्यापूर्वी वोझिन्होचे इन्सटाग्रामवर ५० हजार फॉलोअर्स होते. पण सामन्यातील कामगिरीने त्याच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याच्या फॉलोअर्सचा आकडा पाच दशलक्षापेक्षा पुढे गेला आहे. (All four World Cup matches ended in a draw)

लुकाकोच्या गोलने सामना बरोबरीत

बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातील सामना चुरशीचा झाला. इजिप्तच्या इमाम अशूरने गोल करुन संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर परतफेडीसाठी बेल्जियमने जोरदार चढाया गेल्या. बदली खेळाडू रोमुले लुकाकू मैदानावर उतरला आणि पहिल्याच चढाईत त्याने गोलक्षेत्रात धडक मारली. त्याला रोखण्याच्या प्रयत्नात सेल्फ गोल झाला आणि सामना १-१ बरोबरीत सुटला.

सौदी अरेबिया, उरुग्वे सामना बरोबरीत

मियामीमध्ये सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यात सामना झाला. सौदी अरेबियाने पहिला गोल केला. पण परतफेड करण्यासाठी उरुग्वेला अखेरच्या क्षणापर्यंत झगडावे लागले. मॉक्सिमिलियानेने अराऊजोने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.

न्यझिलंडला इराणने बरोबरीत रोखले

न्यूझिलंडच्या एलिजा जस्टने दोन गोल मारले. त्याने सातव्या आणि ५४ व्या मिनिटाला गोल केले. कर्णधरा ख्रिस वूडने त्याला पास दिले. इराणने पहिल्या आणि दुसऱ्या हाफमध्ये गोल केले. पहिल्या हाफमध्ये रामिन रझाईने बरोबरी साधली. त्यानंतर मोहम्मद मोहब्बीने इराणचा दुसरा गोल केला आणि सामना बरोबरीत आणला. (All four World Cup matches ended in a draw)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman