Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिसांनी राहूल गांधी, प्रियांका, अखिलेश यांना घेतले ताब्यात

पोलिसांनी राहूल गांधी, प्रियांका, अखिलेश यांना घेतले ताब्यात

वी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर तीन तास ठिय्या आंदोलन करणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी, खासदार अखिलेश यादव, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी झालेल्या झटापटीत राहूल गांधी यांच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली आहे. मोदी यांनी निवासस्थानाबाहेर येऊन भेटावे अशी मागणीही काँग्रेस खासदारांनी केली होती.

आंदोलनात अखिलेश यादव, सुप्रिया सुळे सहभागी

पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉग्रेसने दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहूल गांधी, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार प्रियांका गांधीही रणांगणात उतरल्या आहेत. तीन तास काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू होते. राहूल गांधी यांनी 'चलो पीएम हाऊस' असा नाराही दिला आहे. आंदोलनात अखिलेश यादव, सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या होत्या. तीन तासाच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी राहूल गांधींना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याभोवती कडे केले होते. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. पोलिसांनी राहूल गांधी, अखिलेश यादव, प्रियांका गांधी, वेणुगोपाल यांना ताब्यात घेतले. (Police detained Rahul Gandhi)

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक

कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील मोर्चावर पोलिसांनी अमानूष लाठीमार केल्याने देशभर संतापाची लाट पसरली आहे. मोठ्या महानगराबरोबर, शहरे, गावागावात नीट परीक्षाप्रश्नी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जनतेची साथ मिळू लागली आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष आक्रमक झाले असून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने रस्त्यांवरची लढाई सुरू केली असून राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Police detained Rahul Gandhi)

लाठीमाराची संपूर्ण चौकशी करावी

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर प्रतिकात्मक बेड्या घालून आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी खासदारांना ताब्यात घेतले आहे. आंदोलनात 'नरेंद्र मोदी डाऊन, डाऊन…', 'पंतप्रधान मोदी इस्तिफा दो', 'धर्मेंद्र प्रधान इस्तिफा दो' या घोषणा देण्यात आल्या. राहूल गांधी यांच्या आंदोलनाची दखल घेत मंत्री जिंतेंद्र सिंह यांनी राहूल गांधी यांच्या भेटीस आले. त्यांनी राहूल गांधी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ते आंदोलनावर ठाम राहिले. त्यांनी जितेंद्र सिंह यांच्यासमोर पाच मागण्या ठेवल्या. त्यामध्ये केंद्रीय शिक्षण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आंदोलकावरील लाठीमाराची संपूर्ण चौकशी करावी, विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर संसदेत सविस्तर चर्चा करावी, चर्चेच्यावेळी गृहसचिवांनी उपस्थित रहावे, गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व विषयावर भूमिका मांडावी अशा मागण्या केल्या आहेत. राहूल गांधी यांची भेट घेऊन जितेंद्र सिंह पंतप्रधानांना भेटण्यासाठी निवासस्थानी गेले आहेत. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहूल गांधी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. (Police detained Rahul Gandhi)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman