- देवदत्त पट्टनायक
पुरीतील ब्राह्मणांनी मराठा हिंदू राजांऐवजी ईस्ट इंडिया कंपनीच्या ख्रिश्चन सत्तेला का पसंती दिली? (Maratha and British in Jagannath Puri)
हा इतिहास कोणताही सनातनी ब्राह्मण तो पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून सहजपणे सांगणार नाही; पण ही गोष्ट अनेकांना माहिती आहे.
१८०३ मध्ये पुरीतील ब्राह्मणांनी मराठ्यांकडे पाहत एक खोल उसासा टाकला. त्यांची तक्रार होती : हे लोक, म्हणजे मराठे जगन्नाथ मंदिराजवळ शिंकणाऱ्या यात्रेकरूंवरही कर लावतात. ओडिशाकडे ते केवळ दुभत्या गाईसारखे पाहतात आणि पिळवणूक करतात. यात्रेकरू नाराज होते. स्थानिक उच्चवर्ग नाराज होता. पुजारी नाराज होते. फक्त कर वसूल करणारे लोकच समाधानी असावेत.
मग ईस्ट इंडिया कंपनी आली - चमकदार बूट घालून, हात जोडून आणि अतिशय गोड गोड बोलत आले. (Maratha and British in Jagannath Puri)
लॉर्ड वेलस्लीचे अधिकारी जवळपास भक्तांसारखेच वाटत होते. त्यांनी आश्वासन दिले : आम्ही तुमच्या परंपरांचा आदर करू. तुमच्या धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही. तुमचे विशेषाधिकार कायम राहतील. जगन्नाथाचा महिमा पुन्हा उजळून निघेल.
जणू दैवी हस्तक्षेपच
मंदिरातील थकलेल्या पुजार्यांना हे वसाहतवादापेक्षा जणू काही दैवी हस्तक्षेपासारखे वाटले. (Maratha and British in Jagannath Puri)
म्हणूनच सप्टेंबर १८०३ मध्ये इंग्रज पुरीत दाखल झाले, तेव्हा त्यांना फारसा विरोध सहन करावा लागला नाही. ना धगधगती युद्धभूमी. ना महाभारतासारखा संघर्ष.
उलट मंदिर प्रशासनाने नम्रपणे त्यांच्यासाठी दारे उघडली. काही ऐतिहासिक कथांनुसार मंदिराच्या चाव्याही आनंदाने इंग्रजांच्या हवाली करण्यात आल्या.
पुजारी जणू म्हणत असावेत : "कृपया आत या. निदान तुम्ही तरी व्यवस्थित हिशेब ठेवता."
काही काळासाठी सर्वजण खूश होते. (Maratha and British in Jagannath Puri)
इंग्रजांनी सुरुवातीला आपली आश्वासने पाळली. धार्मिक विधी पूर्वीसारखेच सुरू राहिले. पुजार्यांचे नियंत्रण कायम राहिले. करसवलती आणि विशेषाधिकारही अबाधित राहिले.
ब्राह्मणांनी स्वतःचे कौतुक केले असावे :"पाहा, हेच खरे सुसंस्कृत लोक आहेत."
आणि मग कथेला मोठे वळण मिळाले.
ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू दाखवून दिले की ती काही धार्मिक ट्रस्ट नव्हती. ती एक व्यापारी कंपनी होती. जिच्यामागे संपूर्ण साम्राज्य उभे होते.
नवीन महसूलव्यवस्था लागू झाली. नवे कर आले. जुन्या शोषकांच्या जागी आता फक्त अधिक नीटनेटका हिशेब ठेवणारे लोक आले होते.
ज्यांना वाटले होते की, आपण मराठ्यांच्या लोभातून सुटलो, त्यांनाच लवकरच समजले की इंग्रज अधिक पद्धतशीर आणि कार्यक्षम पद्धतीने संपत्ती पिळून घेऊ शकतात. (Maratha and British in Jagannath Puri)
भारतीय राजकारणातली ही जुनी कथा होती :
एक राजा निराश करतो, म्हणून दुसऱ्या राजाला बोलावले जाते.
तो राजा तलवारीऐवजी करार घेऊन हसतमुखाने येतो… आणि मग शांतपणे संपूर्ण अर्थव्यवस्थाच बदलून टाकतो.
काही वर्षांतच ओडिशामध्ये पाइका बंड उसळले.
अनेकांना अचानक जाणवले की ईस्ट इंडिया कंपनीचे हात जरी जोडलेले दिसत असले, तरी त्यांचे बाहू फार लांब होते - आणि त्या प्रत्येकाच्या खिशापर्यंत पोहोचत होते.
मराठे मंदिरांचे संरक्षक
खरं तर ही कथा बरीच गुंतागुंतीची होती.
मराठे ओडिशामध्ये खरोखरच कठोर प्रशासक होते. पण त्याच वेळी त्यांनी जगन्नाथ मंदिराचे संरक्षणही केले होते. जेव्हा भारतातील अनेक मंदिरे तोडली जात होती किंवा सत्तेच्या रोषाला सामोरी जात होती, अशा काळात मराठ्यांनी मंदिरांचे संरक्षण केले होते.
इंग्रज सुरुवातीला अधिक सौम्य वाटले, कारण त्यांना एक महत्त्वाची गोष्ट समजली होती : भारतामध्ये किल्ल्यावर ताबा मिळवण्यापेक्षा मंदिरावर प्रभाव मिळवणे अधिक महत्त्वाचे असते.
इतिहासाची गंमत अशी होती की, आघाड्या वेगाने बदलत होत्या. (Maratha and British in Jagannath Puri)
एका वर्षी पुजार्यांना इंग्रज हे मराठ्यांच्या जुलूमातून मुक्त करणारे वाटत होते. काही वर्षांनी त्याच लोकांना लक्षात आले की, त्यांनी फक्त एक सत्ताधारी वर्ग दुसऱ्याच्या मार्फत बदलला आहे.
फरक इतकाच होता की, नव्या सत्ताधाऱ्यांकडे जहाजे, वह्या, वकील आणि दीर्घकालीन साम्राज्यवादी योजना होत्या. आणि त्यांचा इथून परत जाण्याचा अजिबात इरादा नव्हता.
म्हणून गुरूवर कधीही विश्वास ठेवू नका, नेहमी गूगलमार्फत सत्य तपासा…
गुरू तुमच्या भोळेपणाचा फायदा घेतात, तर गूगल तुमच्या जिज्ञासू वृत्तीवर अवलंबून असते.
(देवदत्त पट्टनायक हे भारतीय पुराणकथांचे विवेचन करणारे भारतातील लोकप्रिय लेखक आहेत.)

