Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शंभुराजेंच्या विजयाने ४५ वर्षानंतर देसाई गट सातारा जिल्हा बँकेत

शंभुराजेंच्या विजयाने ४५ वर्षानंतर देसाई गट सातारा जिल्हा बँकेत

Maharashtra Dinman 3 weeks ago

कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाटण सोसायटी गटात साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी बाजी मारत भाजपच्या सत्यजीत पाटणकरांचा पराभव केला.

शंभुराजेंच्या विजयाने सातारा जिल्हा बँकेत देसाई गट तब्बल ४२ ते ४५ वर्षांनी सत्तेवर आला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी माण गटात एकतर्फी विजय मिळवला. (Desai, Gore win in Satara District Bank)

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर १२ जागांवर चुरशीने मतदान झाल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. पाटणच्या प्रतिष्ठेच्या लढतेत पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सत्यजीत पाटणकरांचा १२ मतांनी पराभव केला. शंभुराजेंना ५८ मते तर पाटणकरांना ४६ मते मिळाली. तब्बल ४२ ते ४५ वर्षांनी देसाई गट सत्तेवर आला आहे. पाटणकर तालुक्यात प्रत्येक निवडणूक ही पाटणकर विरुद्ध देसाई अशा दोन घराण्यात लढली जाते. (Desai, Gore win in Satara District Bank)

नाईक निंबाळकर घराण्याच्या लढतीत संजीवराजेंचा विजय

फलटण गटात नाईक निंबाळकर घराण्यात लढत झाली. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर विजयी झाले. त्यांनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा ११ मतांनी पराभव केला. संजीवराजेंना ७१ तर समशेरसिंहांना ६० मते मिळाली. (Desai, Gore win in Satara District Bank)

चिठ्ठीवर राष्ट्रवादीचे सुनील माने विजयी

कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघामध्ये चिठ्ठी फाटल्याने निवडणुकीत ट्विस्ट आला. सुनील माने यांना ४४ मते (राष्ट्रवादी) आणि सुनील खत्री (भाजप) ४४ मते मिळाल्याने टाय झाला. अखेर चिठ्ठीवर राष्ट्रवादीचे सुनील माने विजयी झाले. कराड सोसायटी गटात उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी दणदणीत विजयाची नोंद केली. उदयसिंह पाटील यांना १०० मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पधी धनाजी पाटील यांना ४५ मते मिळाले. उदयसिंह पाटील हे स्वर्गीय विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव आहेत.

मंत्री जयकुमार गोरेंचा एकतर्फी विजय

माण सोसायटी गटात भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी एकतर्फी विजयाची नोंद केली. जयकुमार गोरे यांना ५३ मते मिळाली. राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना १४ तर जयकुमार गोरे यांचे बंधू शिवसेनेचे शेखर गोरे यांना ७ मते मिळाली. जावळी सोसायटी गटात भाजपचे ज्ञानेश्वर रांजणे ३८ मते मिळवून विजयी झाले. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे विठ्ठल गोळे यांना फक्त ८ मते मिळाली. खंडाळा सोसायटी गटात राष्ट्रवादी अजय भोसले विजयी झाले. त्यांना २८ मते मिळाली. भाजपचे संजीव गाढवे यांना २१ माते मिळाली. तर अपक्ष शामराव गाढवे अपक्ष शून्य मतेमहाबळेश्वर सोसायटी गटात राष्ट्रवादीच्या रुपाली राजपुरे ८ मते मिळवून विजयी झाल्या. शिवसेनेच्या संजय मोरे यांना ४ मते मिळाली.

औद्योगिक विणकर गटात भाजपचे चंद्रकांत जाधव विजयी

औद्योगिक विणकर गटात भाजपचे चंद्रकांत जाधव ७९ मते मिळवून विजयी झाले. अनुसुचित जाती जमाती गटात शिवसेनेचे प्रल्हाद चव्हाण विजयी झाले. त्यांना ६१८ मते मिळाली. भटक्या विमुक्त जाती जमाती गटात भाजपचे अर्जुन काळे विजयी झाले. त्यांना ३४९ मते मिळाली. अपक्ष उमेदवार सुनील वाघ यांना २८४ मते मिळाली. (Desai, Gore win in Satara District Bank)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman